ग्रामीण भागातील साठ हजार जनतेला टॅंकरने पाणीपुरवठा
ग्रामीण भागातील साठ हजार जनतेला टॅंकरने पाणीपुरवठा 
मुख्य बातम्या

परभणी : साठ हजार जनतेला टॅंकरने पाणीपुरवठा

टीम अॅग्रोवन

परभणी ः तीव्र पाणीटंचाई उद्भवलेल्या जिल्ह्यातील २९ गावे आणि ६ तांडे असे एकूण ३५ लोकवस्त्यांवरील ५९ हजार ६७५ ग्रामस्थांची पाण्याची गरज टॅंकरद्वारे भागवली जात आहे. जिल्ह्यातील टॅंकरच्या संख्येत गेल्या २५ दिवसांत १५ टँकरने वाढ झाली आहे. सध्या सहा तालुक्यांतील टंचाईग्रस्त गावांना ४४ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील १९५ गावांमध्ये पाणीटंचाईची तीव्रता अधिक आहे. या परिस्थितीत परभणी, मानवत, पाथरी हे तीन तालुके अद्याप टॅंकरमुक्त आहेत.

वाढते तापमान आणि उपशामुळे जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम, लघू प्रकल्पाची जलाशये तळ गाठत आहेत. विहिरी, बोअर आटत आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट अधिकच गहिरे होत आहे. त्यामुळे टॅंकरने पाणीपुरवठा कराव्या लागणाऱ्या तसेच विहीर अधिग्रहण करावे लागणाऱ्या गावांच्या संख्येत भर पडत आहे. सध्या पालम तालुक्यात सर्वाधिक १६ टॅंकर सुरू आहेत. त्यानंतर जिंतूर तालुक्यात ९ टॅंकर, पूर्णा तालुक्यात ८ टॅंकर, सेलू तालुक्यात ६ टॅंकर, गंगाखेड तालुक्यात ३ आणि सोनपेठ तालुक्यात २ अशा जिल्ह्यांत एकूण ६ सरकारी आणि ३८ खासगी टॅंकर ३५ लोकवस्त्यावरील ५९ हजार ६७५ लोकसंख्या पाण्याची गरज भागविण्यासाठी टॅंकरवर अवलंबून आहे. या लोकवस्त्यांवर टॅंकरच्या एकूण २ हजार ५८९ फेऱ्या मंजूर करण्यात आल्या आहेत.

२१५ विहिरींचे अधिग्रहण जिल्ह्यातील गंभीर पाणीटंचाई उद्भभवलेल्या १९५ गावांतील नागरिकांना पाणीपुरवठ्यासाठी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये टॅंकरसाठी ३३ आणि टॅंकरव्यतिरिक्त १८२ असे एकूण २१५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

टॅंकर सुरू असलेली गावे जिंतूर तालुका मांडवा, करवली, कोरवाडी, देवसडी, मोहाडी, वाघी धानोरा वडी, घागरा, भोसी. सेलू तालुका ः तळतुंबा, वालूर, पिंपरी गोडगे, नागठाणा कुंभारी, पिंपळगांव गोसावी, गुळखंड. सोनपेठ तालुका ः नरवाडी, कोथाळा. गंगाखेड तालुका ः गोदावरी तांडा, उमरानाईक तांडा, खंडाळी. पालम तालुका ः चाटोरी, नाव्हा,आनंदवाडी, रामापुरा तांडा, पेंडु खुर्द, सादलापूर (मानगीरवाडी), पेंडु बुद्रुक, बंदरवाडी, पेठशिवणी, पेठपिंपळगाव, सातेगाव. पूर्णा तालुका ः पिंपळा लोखंडे, बरबडी, देगांव, आहेरवाडी, गोविंदपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT