संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पाच लघू तलावांतील पाणीसाठ्यात घट

टीम अॅग्रोवन

परभणी : जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पांच्या तलावांपैकी ५ तलावातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. एका तलावातील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. उर्वरित १६ तलावांमध्ये सरासरी २७ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. गतवर्षी सर्व लघू प्रकल्पांच्या तलावांमध्ये सरासरी ७३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता. दिवसेंदिवस पाणीसाठा घटत चालल्यामुळे यंदा अनेक भागांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यातील विशेषतः जिंतूर आणि गंगाखेड तालुक्यांतील लघू तलावांमध्ये यंदा मुबलक प्रमाणात पाणीसाठा जमा झाला नाही. त्यामुळे यंदा लवकरच जिंतूर तालुक्यातील आडगाव, दहेगाव आणि चिंचोली, नखातवाडी (ता. सोनपेठ), टाकळवाडी (ता. गंगाखेड) या तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

कोद्री तलावातील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे. तांदुळवाडी तलावामध्ये केवळ १ टक्का उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. रविवारी (ता.१०) झरी (६७ टक्के), आंबेगाव (४२ टक्के), पेडगाव (३२ टक्के), राणीसावरगाव (२३ टक्के), पिंपळदरी (१६.५९ टक्के), देवगाव (२४ टक्के), जोगवाडा (१२ टक्के), बेलखेडा (४२ टक्क), वडाळी (१८ टक्के), चारठाणा (५६ टक्के), केहाळ (१९ टक्के), भोसील (२३ टक्के), कवडा (२७ टक्के), मांडवी (५५ टक्के), पाडाळी (९१ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. गतवर्षी सर्व तलावांमध्ये ७३ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता.

गतवर्षी करपरा मध्यम प्रकल्पामध्ये ८७ टक्के तर रविवारी (ता. १०) ६७ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. मासोळी मध्यम प्रकल्पांमध्ये गतवर्षी ९१ टक्के, तर रविवारी (ता. १०) २१ टक्के आहे. गतवर्षी मुळी येथील गोदावरी नदी वरील बंधाऱ्याचे दरवाजे निकामी झाल्यामुळे यंदा या बंधाऱ्यात उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही. गतवर्षी येलदरी आणि सिद्धेश्वर धरणांमध्ये अनुक्रमे २८.४७ आणि ४५.७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. रविवारी (ता. १०) येलदरीमध्ये १२.९६ टक्के आणि सिद्धेश्वरमध्ये ४३.३८ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

उपसा केला जात असल्यामुळे तसेच बाष्पीभवनामुळे प्रकल्पांतील पाणीसाठ्यात घट होत असल्यामुळे यंदा अनेक भागांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा लवकरच सोसाव्या लागणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT