पुणे विभागातील पाणीटंचाई अधिक तीव्र
पुणे विभागातील पाणीटंचाई अधिक तीव्र 
मुख्य बातम्या

पुणे विभागातील पाणीटंचाई अधिक तीव्र

टीम अॅग्रोवन

पुणे : विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई अधिकच तीव्र होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातच या चार जिल्ह्यांच्या २६ तालुक्यांमधील १९८ गावे १३२२ वाड्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल २०० टॅंकर सुरू करावे लागले आहेत. पिण्याच्या पाण्याचे स्रोत कोरडे पडल्याने विभागातील सुमारे ४ लाख २१ हजार लोकसंख्या आणि २७ हजार जनावरांची तहान टॅंकरच्या पाण्यावर भागत असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली. 

पुणे जिल्ह्यात ८ तालुक्यांना झळा पुणे जिल्ह्याच्या दुष्काळी भागात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील ८ तालुक्यांमधील ३२ गावे ३६८ वाड्यांमध्ये टंचाई असून, १ लाख १२ हजार लोकसंख्येला ३२ टॅंकरच्या साह्याने पाणी पुरवठा केला जात आहे. शिरूर आणि बारामती तालुक्यात सर्वाधिक झळा बसत आहेत. दौंड, पुरंदर, जुन्नर, आंबेगाव, इंदापूर, खेड तालुक्यातही पाणीटंचाई वाढत आहे. 

माण तालुक्यात सर्वाधिक टंचाई सातारा जिल्ह्यातील कोरडवाहू पट्ट्यात असेलेल्या माण, खटाव, फलटण आणि कोरेगाव या चार तालुक्यांमध्ये पाणीटंचाई वाढली आहे. जिल्ह्यातील ६२ गावे ३५३ वाड्यांमध्ये ५५ टॅंकर सुरू आहेत. यात माण तालुका विभागातील सर्वाधिक टंचाईग्रस्त असून, तेथे ४४ गावे, ३३३ वाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी ४३ टॅंकर सुरू आहेत. माण तालुक्यातील ७४ हजारांहून अधिक लोकसंख्या आणि २१ हजारहून अधिक जनावरांना टॅंकरची मदत घ्यावी लागत आहे. खटाव आणि फलटण तालुक्यातही टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. 

सांगली जिल्ह्यात ६६ टॅंकर सांगलीच्या पाच तालुक्यांतील ७५ गावे ४९२ वाड्यांमधील सुमारे दीड लाखाहून अधिक लोकांना पाणीपुरवठा करण्यासाठी ६६ टॅंकर धावत आहेत. जिल्ह्यातील जत आणि आटपाडी तालुक्यात पाणीटंचाई चांगलीच वाढली असून, आटपाडीमधील २२ गावे १६५ गावे व जतमधील ३४ गावे २६७ गावांत टॅंकर सुरू आहेत. खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात टंचाई भासू लागली आहे. 

सोलापूर जिल्ह्यात टंचाई वाढली पुणे, सातारा, सांगलीपाठोपाठ यंदा सोलापूर जिल्ह्यातही टंचाई वाढू लागली आहे. ९ तालुक्यांमध्ये टंचाई भासू लागली आहे.

टंचाईग्रस्त भागात सुरू असलेल्या टॅंकरची तालुकानिहाय संख्या  पुणे - शिरूर १७, बारामती १६, दौंड ७, आंबेगाव ५, पुरंदर ३, जुन्नर ३, खेड ३, इंदापूर १. सातारा - माण ४२, खटाव ६, कारेगाव ५, फलटण २.  सांगली - जत २६, आटपाडी १७, कवठेमहांकाळ ६, खानापूर ५, तासगाव १. सोलापूर - सांगोला ७, माढा ४, करमाळा ४, मोहोळ ३, अक्कलकोट २,  दक्षिण सोलापूर १, मंगळवेढा १, माळशिरस १, उत्तर सोलापूर १.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

Agriculture Processing Industry : प्रक्रिया उद्योगात तयार झाली ओळख

Hanneborg Farm : नॉर्वेमधील ग्राहकांची ‘हॅनेबॉर्ग फार्म’ला पसंती

SCROLL FOR NEXT