खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटका
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटका 
मुख्य बातम्या

खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटका

टीम अॅग्रोवन

नंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी होत आहे. त्यास उन्हासह पाणीटंचाईचा मोठा फटका बसत आहे. खानदेशात पपईचे ४०० ते ४५० हेक्‍टर क्षेत्र कमी होईल, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. 

जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित दर सध्या मिळत नसल्याचे चित्र आहे. तापीकाठ वगळता सर्वत्र पाणीटंचाई आहे. तापीकाठी केळी व इतर पिके आहेत. पुढे पूर्वहंगामी कापसाची लागवड सुरू होईल. त्यासही पाण्याची नियमित आवश्‍यकता असेल. यामुळे पपई पीक शेतकरी कमी करीत अाहेत. त्याचे क्षेत्र घटत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा व अक्कलकुवामध्ये दरवर्षी दोन ते अडीच हजार हेक्‍टरवर लागवड असते. या वेळेस नंदुरबार व शहादामधील पूर्व भागात पाणीटंचाईचा फटका पिकाला बसत आहे. 

जळगाव जिल्ह्यात यावल, रावेर, चोपडा, पाचोरा व जामनेरात लागवड केली जाते. यातील पाचोरा, जामनेर व चोपडा भागात लागवड कमी झाली आहे. मध्यंतरी बियाण्याबाबत वाद झाले होते. यामुळे शेतकरी, नर्सरी चालकांमध्ये भीती वाढली. जळगाव जिल्ह्यातही २०० ते २५० हेक्‍टर क्षेत्र कमी होईल, अशी स्थिती आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, शिरपूर व धुळे तालुक्‍यात दरवर्षी २०० ते ३०० हेक्‍टरवर लागवड असते. परंतु या भागातही लागवड ५० ते ६० हेक्‍टरने कमी होईल, असा अंदाज आहे. 

कमी दरांचा मुद्दा मार्च व या महिन्यातही चर्चेत राहिला. उष्णता वाढत असल्याने व्यापारी खरेदीसाठी अडवणूक करीत अाहेत. किमान साडेचार रुपये प्रतिकिलोचा दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. परंतु तीन रुपये दर थेट शेतात शेतकऱ्यांना मिळाला. पाणीटंचाईमुळे सरत्या हंगामातील धुळे जिल्ह्यातील शिरपूर व शिंदखेडा भागातही पपईचे पीक जवळपास संपले आहे. दरांच्या वादामुळेदेखील लागवड कमी होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

SCROLL FOR NEXT