संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

गडहिंग्लज, चंदगड तालुक्यात दहा गावांत पाणीटंचाई

टीम अॅग्रोवन

गडहिंग्लज, जि. कोल्हापूर  : गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्‍यांतील दहा गावांमधील ग्रामस्थांना एप्रिल ते जून दरम्यान पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. यातील नऊ गावांत खासगी विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहण करण्यात येणार असून तडशिनहाळ (ता. चंदगड) येथे तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजनेचा उपाय सुचवण्यात आला आहे. 

जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे त्या-त्या तालुक्‍यातील गावांचा सर्व्हे करून संभाव्य पाणीटंचाई जाणवणारी गावे, वाड्यांचा प्रस्ताव तयार केला जातो. ऑक्‍टोबर ते मार्चअखेर कुठेही टंचाई नसल्याचा अहवाल होता. परंतु, एप्रिल ते जून अखेरच्या टप्प्यात टंचाई जाणवणाऱ्या गावांचा प्रस्ताव तयार करून प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. चंदगड तालुक्‍यातील चार गावांत टंचाईची झळ बसणार असून ही गावे प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी घोषित केली आहेत. गडहिंग्लज तालुक्‍यातील सहा गावात टंचाईसदृश्‍य स्थिती आहे. या गावांचेही प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे दिले आहेत. परंतु, ती गावे अद्याप घोषित झालेली नाहीत. 

जानेवारी ते मार्च या टप्प्यात गडहिंग्लजमधील १४ गावांमध्ये टंचाईसदृश्‍ा स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता गृहीत धरून पाणीपुरवठा विभागाने प्रस्ताव दिला होता. परंतु, हा प्रस्ताव उशिरा पोचल्याने आणि पाण्याची उपलब्धतताही मार्चअखेरपर्यंत असल्याने ही गावे घोषित झाली नसल्याचे सांगण्यात आले. परंतु, एप्रिल ते जून अखेरची गावे दोन दिवसांत घोषित करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. एप्रिल ते जून या कालावधीसाठी चंदगडमधील चार तर गडहिंग्लजमधील सहा गावे आहेत.

यातील बहुतांशी ठिकाणी खासगी कूपनलिका आणि विहीर अधिग्रहणाची शिफारस आहे. एकही नवीन कूपनलिका खोदाईचा समावेश नाही. गेल्या काही वर्षांपेक्षा यंदा टंचाईची झळ कमी असल्याचेही सांगण्यात येते. म्हणूनच टंचाईसदृश्‍ा गावच्या संख्येतही घट झाली आहे. आता घोषित केलेल्या गावांमध्ये तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांची आहे. टंचाईची कामे पावसाळा तोंडावर आल्यानंतरच सुरू होतात, हा नेहमीचा अनुभव आहे. यंदा तरी किमान तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा संबंधित गावातील जनतेची आहे.    टंचाईची गावे व उपाय    

  • गडहिंग्लज तालुका : शिंदेवाडी, नौकूड, मासेवाडी, बिद्रेवाडी, मनवाड, तुप्पूरवाडी (खासगी कूपनलिका व विहीर अधिग्रहणाचा उपाय)
  • चंदगड तालुका : बोंजुर्डी पैकी मोरेवाडी, जट्टेवाडीपैकी मजरे जट्टेवाडी, मौजे जट्टेवाडी (खासगी विंधन विहीर व विहीर अधिग्रहण), तडशिनहाळ (तात्पुरती नळ पाणी योजना)
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; कापूस, सोयाबीन, मका, हळद तसेच टोमॅटोचे काय आहेत दर ?

    Pre-Sowing Tillage : धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग

    Water Scarcity : जळगाव जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाई कमी

    Kharif Season : खरिपासाठी पैसा उभा करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

    Summer Heat : उन्हाचा चटका; पिकांनाही फटका

    SCROLL FOR NEXT