Water on one lakh hectare crop in Hingoli, Parbhani
Water on one lakh hectare crop in Hingoli, Parbhani 
मुख्य बातम्या

हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर पाणी

टीम अॅग्रोवन

हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे पूर, यामुळे जिल्ह्यातील सुमारे ८७ हजार हेक्टर तर परभणी जिल्ह्यातील २६ हजारावर हेक्टरवर असे एकूण १ लाख १३ हजार हेक्टरवरील खरिप पीकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज  आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर एकूण नुकसाग्रस्त क्षेत्राची माहिती अंतिम करण्यात येईल, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान, शनिवारी (ता.२६) सकाळी संपलेल्या २४ तासांत परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ५२ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील एका मंडळात अतिवृष्टी झाली. गेल्या १५ ते २० दिवसांपासून परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात पाऊस सुरु आहे.

सततच्या पावसाचा सर्वाधिक फटका या दोन जिल्ह्यातील प्रमुख नगदी पिके असलेल्या सोयाबीन, कपाशी, तूर, ऊस, हळद, ज्वारी, बाजरी  आदीसह भाजीपाला, फळपिकांना फटका बसला आहे. त्यातही काढणीच्या अवस्थेतील सोयाबीनच्या शेंगांना, वेचणीच्या अवस्थेतील कपाशीच्या फटका बसला आहे.

सोयाबीनच्या शेंगांना तसेच फुटलेल्या बोंडातील सरकीला झाडावरच मोड फुटले आहेत. दूधना, पूर्णा, कयाधू, करपरा आदी नद्यासह ओढे नाल्याच्या पुराचे पाणी पिकांमध्ये साचले. त्यामुळे तूर, कपाशी, सोयाबीनमध्ये मुळकुज होऊन उभे पीक वाळून गेले आहे. 

पिकांची काढणी, वेचणी खोळंबली

सोयाबीनची काढणी, कापसाच्या वेचणीची कामे खोळंबली आहेत. कृषी विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून नुकसानीचे सर्वेक्षण सुरु आहे. नुकसानीबद्दल सर्वच पिकांचा विमा परतावा मंजूर करावा, विमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकरी, विविध पक्ष, शेतकऱ्यांच्या संघटनांनी केली  आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Dam : कोल्हापूर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाणीसाठा, शेतीसाठी दोन आर्वतने मिळणार?

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

SCROLL FOR NEXT