संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नाशिक येथे बुधवारी पाणी व्यवस्थापन परिषद

टीम अॅग्रोवन

नाशिक ः सातत्याने उद्भवणाऱ्या दुष्काळी स्थितीमुळे शेतीतील पाणी व्यवस्थापन हा मुद्दा आता कळीचा बनला आहे. त्यामुळे ‘सकाळ-ॲग्रोवन’ने सन २०१९ हे जल व्यवस्थापन वर्ष जाहीर केले असून, त्याअंतर्गत राज्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांसाठी पाणी व्यवस्थापन परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे. या मालिकेतील पहिली परिषद येत्या बुधवारी (२६ जून) नाशिक येथे होणार आहे.      

या परिषदेमध्ये राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रातील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुंवर आणि सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब व भाजीपाला उत्पादक शेतकरी अंकुश पडवळे मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे कोषाध्यक्ष कैलास भोसले यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता परिषदेचे उद्घाटन होईल. ड्रीप इंडिया इरिगेशन प्रा. लि. व सपल ॲग्रोटेक प्रा. लि. हे परिषदेचे प्रायोजक आहेत. डॉ. सोमकुंवर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय असून त्यांचा सल्ला मोलाचा मानला जातो. श्री. पडवळे दुष्काळी भागातील तरुणांना गटशेतीच्या माध्यमातून एकत्र करून कमी पाण्यामध्ये अवशेषमुक्त भाजीपाला, डाळिंब शेतीचे यशस्वी नियोजन करीत आहेत.   

पाणी व्यवस्थापन परिषद का?  महाराष्ट्राला दुष्काळाचीही मोठी परंपरा आहे. त्यातच हवामान बदलामुळे मोसमी पावसाचे स्वरूपही बदलत आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी तंत्रज्ञानासह काही परंपरागत उपाययोजनांचा अवलंब करण्याचीही गरज आहे. राज्यात जलसंधारणाची चर्चा उदंड होते आहे. मात्र अडवलेल्या, जिरवलेल्या पाण्याच्या उत्तम व्यवस्थापनाविषयी फारसे बोलले जात नाही. उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्याशिवाय शेतीतून समृद्धी मिळविणे अशक्यच आहे. पाण्यासाठी सुरू असलेले संघर्षही त्याशिवाय थांबणार नाहीत. हा मुद्दा अधोरेखित करण्यासाठीच राज्यभरात पाणी व्यवस्थापन परिषदांचे आयोजन केले जात आहे. ‘मोअर क्रॉप पर ड्रॉप'' हा मंत्र शेतीक्षेत्रासाठी परवलीचा ठरणार आहे. हाच संदेश तज्ज्ञांच्या माध्यमातून कृती कार्यक्रमासह शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचा ‘ॲग्रोवन’चा प्रयत्न राहील.     पाणी व्यवस्थापन परिषद

  •  केव्हा ः बुधवार, २६ जून २०१९ (सकाळी १०.३० ते १.३०)
  •   कोठे ः कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह, केटीएचएम कॉलेजजवळ, गंगापूर                   रोड, नाशिक
  •   प्रवेश ः सर्वांना विनामूल्य
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

    Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

    Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

    Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

    Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

    SCROLL FOR NEXT