Water contaminated in 85 villages of Nagar district
Water contaminated in 85 villages of Nagar district 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्याच्या ८५ गावांतील पाणी दूषित

टीम अॅग्रोवन

नगर ः जिल्ह्यातील १४ तालुक्‍यांत ऑगस्टमध्ये पाण्याचे १३५४ नमुने तपासण्यात आले. त्यांत ८५ गावांतील ११६ नमुने दूषित आढळून आले.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नियमितपणे पाणीनमुने तपासले जातात. पाणी दूषित आढळल्यास संबंधित ग्रामपंचायतींना सूचना केल्या जातात. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व भूजल विभागाकडून दरमहा तपासल्या जाणाऱ्या दूषित पाण्याच्या नमुन्यांची संख्या वाढत आहे. ऑगस्टमध्ये तपासलेल्या १३५४ पैकी ८५ नमुने दूषित आढळले. या महिन्यात दूषित पाण्याची टक्केवारी ८.५७ वर गेली आहे.

श्रीगोंदे तालुक्‍यात २० गावांतील पाण्याचे २२ नमुने दूषित आढळले. त्याखालोखाल राहुरीतील १० गावांतील पाण्याचे १९ नमुने दूषित आढळून आले. एक एप्रिल ते ३१ ऑगस्टदरम्यान जिल्ह्यातील ७४०३ नमुने तपासण्यात आले. त्यांत ४१० दूषित आढळून आले. जिल्ह्याची टक्केवारी ५.४४ आहे. जामखेड तालुक्‍यातील २७ नमुने तपासले असून, त्यांत एकही नमुना दूषित आढळला नाही.

नगर ः बुऱ्हाणनगर, कापूरवाडी, वारूळवाडी, नागरदेवळे, मेहेकरी, सोनेवाडी, भातोडी, पारगाव, पारेवाडी, खांडके, बारदरी, पिंपळगाव लांडगा, कामरगाव, अकोळनेर. अकोले ः मुथाळणे, समशेरपूर, सावरगाव पाट, टाकळी, खानापूर, आगर. कर्जत ः लोणी मसदपूर, बहिरोबावाडी, पाथरवाडी, धांडेवाडी. कोपरगाव ः मळेगाव थडी, माहेगाव देशमुख, आपेगाव. नेवासे ः निपाणी निमगाव, कारेगाव. पारनेर ः अळकुटी, भाळवणी, दैठणे गुंजाळ, धोत्रे खुर्द व बुद्रुक, गोरेगाव, गारगुंडी, सुपे. पाथर्डी ः माणिकदौंडी, मुंगसेवाडी, चितळी, येळी, तिनखडी, हत्राळ. शेवगाव ः रांजणगाव खुर्द, पिंप्री लौकी, नपावाडी. राहुरी ः उंबरे, धामोरी खुर्द व बुद्रुक, बाभूळगाव, चेडगाव, वळण, सडे, पिंप्री अवघड, मल्हारवाडी. संगमनेर ः पारेगाव खुर्द, नान्नज दुमाला, वडगावपान, मळेगाव हवेली. श्रीगोंदे ः मांडवगण, घोगरगाव, तरडगव्हाण, दुलेगाव, वेळू, हिरडगाव, आढळगाव, निंबवी, कोरेगव्हाण, राजापूर, बेलवंडी, म्हसे, वडगाव, येळपणे, पोलिसवाडी, उक्कडगाव, कौठे. श्रीरामपूर ः लाडगाव.

तालुकानिहाय तपासलेले नमुने (कंसात दूषित नमुने) नगर ः १४३ (१८), अकोले १८० (१०), कर्जत २६ (पाच), कोपरगाव ९० (तीन), नेवासे ४८ (दोन), पारनेर ८९ (१८), पाथर्डी ११३ (सहा), शेवगाव ८१ (चार), राहाता ः ६६ (तीन), राहुरी १३८ (१९), संगमनेर १३५ (चार), श्रीगोंदे १५२ (२२), श्रीरामपूर ६६ (दोन).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT