संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पुणे विभागात तब्बल ९५७ टॅंकरव्दारे पाणीपुरवठा

टीम अॅग्रोवन

पुणे  : उन्हाचा वाढलेला चटका, भूजलपातळीत झालेली घट यामुळे पुणे विभागातील ४० तालुके पाणीटंचाईच्या खाईत लोटले गेले आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांतील ७९१ गावे ४६६६ वाड्यांमध्ये तीव्र टंचाई असल्याने तब्बल ९५७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टंचाईग्रस्त भागातील १६ लाख ६५ हजार ६७१ लोकसंख्या आणि अडीच लाख जनावरांची तहान भागविण्यासाठी ४३० विहिरी आणि विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली. 

विभागातील तापमानात झालेल्या वाढीमुळे धरणे, लहान मोठे तलाव कोरडे पडले आहेत. यातच भूजलाचा उपसा वाढल्याने गावोगावी पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. मात्र कोल्हापूर जिल्ह्यासह, सांगलीतील पलूस, केडगाव, वाळवा, शिराळा आणि पुण्यातील मावळ हे तालुके वगळता उर्वरीत सर्वच तालुक्यांत टॅंकर सुरू करावे लागले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील २४६ गावे १५१७ वाड्यांमध्ये सर्वाधिक २८२ टॅंकर सुरू आहेत. सांगली जिल्ह्यातील १८२ गावे ११४१ वाड्यांना १९० टॅंकरने पाणी पुरविले जात आहे. साताऱ्यातील २१६ गावे ८९० वाड्यांना २५३ टॅंकरने, तर पुणे जिल्ह्यातील १४७ गावे १ हजार ११८ वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी २३२ टॅंकर धावत आहेत. विभागातील तब्बल १६ लाख ६५ हजार ६७१ लोकसंख्या आणि सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यातील अडीच लाख पशुधनाला टॅंकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.

यात सोलापूर जिल्ह्यातील ५ लाख ५४ हजार, सांगलीतील ३ लाख ८३ हजार, साताऱ्यातील जिल्ह्यातील सुमारे ३ लाख ६१ हजार, पुणे जिल्ह्यातील ३ लाख ६६ हजार लोकसंख्येचे समावेश आहेत. सातारा जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार, तर सांगलीतील सुमारे ६३ हजार, तर पुण्यातील ३ हजारांहून अधिक जनावरांना टॅंकरने पाणी पुरविण्यात येत आहेत.    

 टॅंकरची तालुकानिहाय संख्या :

  •  पुणे - इंदापूर ३८, बारामती ३७, शिरूर २९, पुरंदर २७, आंबेगाव २५, दौंड २३, जुन्नर २१, खेड ८, हवेली ८, भोर ५, वेल्हा ५, मुळशी ४.   
  • सातारा - माण १११, खटाव ४२, कारेगाव ३६, फलटण ३१, वाई ६, पाटण ६, महाबळेश्वर ३, सातारा २, खंडाळा २, कराड २.
  • सांगली - जत १०९, आटपाडी ३५, कवठेमहांकाळ १४, तासगाव ८, खानापूर १३, मिरज ४.
  • सोलापूर - मंगळवेढा ५५, करमाळा ४९, सांगोला ४६, माढा २६, दक्षिण सोलापूर २४, मोहोळ २३, उत्तर सोलापूर १६, माळशिरस १६, बार्शी १२, अक्कलकोट १२. पंढरपूर १.
  • विभागातील पाणीटंचाईची  जिल्हानिहाय स्थिती
    जिल्हा गावे  वाड्या एकूण टँकर्स
    पुणे  १४७ १११८  २३२
    सातारा   २१६ ८९० २५३
    सांगली   १८२ ११४१ १९०
    सोलापूर  २४६   १५१७ २८२
    एकूण   ७९१ ४६६६ ९५७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Hivre Bajar : हिवरे बाजार मॉडेल नेपाळ राबविणार

    Ethanol Production : केंद्राच्या निर्बंधांमुळे इथेनॉल निर्मितीत घट

    Turmeric Seed : पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी थांबवली हळद बियाणे खरेदी

    Agriculture Department : कृषी खात्याला गती देण्यासाठी ‘गेडाम पॅटर्न’

    Mango Market : नागपूर-अमरावतीत स्थानिक आंबा वाणांचे दर दबावात

    SCROLL FOR NEXT