Warning of heavy rains in North Konkan, North Maharashtra
Warning of heavy rains in North Konkan, North Maharashtra 
मुख्य बातम्या

उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा 

टीम अॅग्रोवन

पुणे : अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. आज (ता. १) उत्तर कोकणातील पालघर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

राज्यात गारठा वाढला असतानाच ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात चढ-उतार सुरू आहे. अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १५ अंशांच्या पुढे गेला आहे. मंगळवारी (ता. ३०) गोंदिया येथे नीचांकी १०.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अलिबाग येथे उच्चांकी ३४.४ अंश सल्सिअस तापमान नोंदले गेले. 

मंगळवारी (ता. ३०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :  पुणे २८.१ (१६.६), जळगाव २९.९ (१७), कोल्हापूर २६.५ (२०.७), महाबळेश्‍वर २१.८(१५.५), मालेगाव २८.२ (१४.३), नाशिक २७.६ (१६.२), निफाड २९.३ (१७.२), सांगली २७.४ (२१.४), सातारा २६.२ (२१.३), सोलापूर २९ (१८.१), सांताक्रूझ ३४ (२३.८), अलिबाग ३४.४ (-), डहाणू ३३.७ (२१.४), रत्नागिरी ३४.१ (२६), औरंगाबाद २८.२ (१८), नांदेड ३२.४ (१९.२), उस्मानाबाद - (१६.४), परभणी २७.६ (१८.९), अकोला ३१.४ (१८.६), अमरावती ३०.२ (१५), ब्रह्मपुरी ३२.१ (१५.२), बुलडाणा २८.५ (१६.५), चंद्रपूर २९.४ (१७.६), गडचिरोली २९ (१५), गोंदिया २८.८ (१०.९), नागपूर ३०.२ (१२.५), वर्धा २९.८ (१५), वाशीम ३१.५ (१५), यवतमाळ ३०.५ (१५).   

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत  बंगालच्या उपसागरात दक्षिण थायलंड जवळ हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र अंदमान समुद्राकडे सरकत आहे. ही प्रणाली वायव्येकडे सरकून भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे येताना तीव्र होऊन बंगालच्या उपसागरात शुक्रवारपर्यंत (ता. ३) चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. हे संभाव्य चक्रीवादळ आंध्र प्रदेश ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या वाऱ्यांच्या प्रभावांमुळे महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतच्या समुद्रात आज (ता.१) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT