in Warhad damage to agricultural crops due to rain
in Warhad damage to agricultural crops due to rain  
मुख्य बातम्या

वऱ्हाडात पावसाने उडविली शेतकऱ्यांची पुन्हा दाणादाण

टीम अॅग्रोवन

अकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तीन जिल्ह्यात बुधवारी (ता. २५) पुन्हा एकदा वादळी पावसाने धुमाकूळ घातला. पूर्व मोसमी पावसाचा बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्याला सर्वात मोठा तडाखा बसला. या तालुक्यात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

या विभागात मार्च महिन्यात तिसऱ्यांदा अशा प्रकारचे आस्मानी संकट आलेले आहे. अद्यापही विदर्भात पावसाचा इशारा कायम असून ढगाळ वातावरण सर्वत्र बनलेले आहे. बुधवारी दुपारी तीन वाजेनंतर खामगाव तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस झाला. पारखेड शिवारात विजांच्या कडकडाटात पाऊस पडला. या गावात महादेव खराटे यांच्या शेतात वीज पडून एक म्हैसही दगावली.

शेतकऱ्यांचा काढणीला आलेला गहू, हरभरा ओला झाला. वादळामुळे खामगावमध्ये झाडे पडली. तर अनेकांच्या घरांवरील छत उडून गेले. नांदुरा, मोताळा, बुलडाणा, चिखली तालुक्यांमध्ये बऱ्याच गावात पाऊस झाला. अकोला जिल्ह्यात बाळापूर, पातूर, मूर्तिजापूर, अकोला, बार्शिटाकळी, तेल्हारा या तालुक्यांमध्ये पावसाने काही ठिकाणी जोरदार हजेरी दिली. या पावसाने सोंगणीला आलेल्या गव्हाचे अतोनात नुकसान झाले आहे. वाशीम जिल्ह्यातही पावसाने नुकसान केले. 

मी यावर्षी जानेवारी महिन्यात चार मीटर उंचीच्या शेडनेटची उभारणी केली. अद्याप अनुदान मिळायचे बाकी आहे. या शेडनेटमध्ये काकडीची लागवड केली होती. आठवड्याभरात ही काकडी उत्पादन सुरू होणार होते. या अस्मानी संकटामुळे शेडनेटची नेट फाटून उडाली. शेडनेटचे खूप मोठे नुकसान झाले. शेडनेट उभारणीसाठी स्टेट बॅंकेकडून पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. शेतातील पपईची झाडेही उन्मळून पडाली.  - भाऊराव रामदास हेलगे, रा. पारखेड ता. खामगाव, जि. बुलढाणा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT