नगर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा Waiting for rain in Nagar district
नगर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा Waiting for rain in Nagar district 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन

नगर : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडत असला तरी नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याचा पश्चिम भाग वगळता जिल्हाभरात पावसाची प्रतीक्षा आहे. अकोले तालुक्यात दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाला असल्याने भंडारदरा, निळवंडे धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. मुळातही पाणी येण्याची आशा वाढली आहे.   नगर जिल्ह्यात खरिपाच्या सरासरीएवढी पेरणी होत आली असली तरी गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा पेरणीचे क्षेत्र कमीच आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. सर्वाधिक पाऊस पडत असलेल्या अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातही यंदा अजून जोरदार पावसाची प्रतीक्षा होती. पाऊस नसल्याने भात लावणीलाही फारसा वेग येत नव्हता. मुंबई, कोकणात व घाटमाथ्यावर दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने अकोल्याच्या पश्चिम भागातील घाटघर, रतनवाडी, पांजरे, वाकी, भंडारदरा परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपासून या परिसरात पाऊस पडत असल्याने भंडारदरा धरणात ०.२५ टीएमसी पाणी आले आहे. भंडारदरा धरणातून ८३७ क्युसेकने प्रवरा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुळा नदीही कोतूळजवळ ३ हजार २१२ क्युसेकने पाणी वाहत आहे. मंगळवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत घाटघरला ७४, रतनवाडीला ८२, पांजरे येथे ४६, वाकी येथे ३५, भंडारदरा येथे ४१ मिलिमीटर पाऊस  झाला. जिल्ह्याच्या अन्य भागात मात्र पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस नसल्याने अन्य प्रकल्पात पाण्याची आवक नाही.

कोयना धरण ५० टक्के भरले सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणात पाणी आवक वाढली आहे. धरणात पाण्याची आवक २८ हजार ६५६ क्युसेकने होत आहे. धरणातील पाणीसाठा ५४.०५ टीएमसी झाला आहे.  जिल्ह्यात बहुतांशी भागात पाऊस सुरू झाला आहे. अधूनमधून हलका ते मध्यम पावसाच्या सरी कोसळत आहे. कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी (ता. २०) पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायमच होती. पाणलोट क्षेत्रातील कोयनानगरला ८९, नवजात १५२, तर महाबळेश्वर येथे ११३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाची जलपातळी २१११.१० फूट असून, धरणात ५४.०५ टीएमसी एकूण तर ४८.९३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.   इतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक स्वरूपात पाऊस सुरू झाला आहे. मात्र जुलै, ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसावर धरणात सर्वाधिक पाणीसाठा होत असतो. यंदा मात्र जून व जुलै महिन्याचे तीन आठवडे पावसाशिवाय गेले आहे. यामुळे ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसावर धरणाचे भवितव्य ठरणार आहे. जिल्ह्यात पिकांची वाढ होण्यासाठी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. मंगळवारपासून कमी प्रमाणात का होईना सुरू झालेला पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार आहे. मात्र पिकांच्या वाढीसाठी दमदार पावसाची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

पुरंदरमधील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत परिंचे, जि. पुणेे : काळदरी (ता.पुरंदर) खोऱ्यात पाण्याची उपलब्धता झाली अशा तुरळक ठिकाणी भात लागणीला सुरुवात झाली आहे. पुरंदर किल्ला परिसर पावसाचे आगार समजले जात असले तरी बहुतांशी भागातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत असून पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे भात रोपांवर परिणाम झाला असून, रोपांच्या संख्येत घट झाली असल्याचे बहिरवाडी येथील शेतकरी राजेंद्र भगत यांनी सांगितले. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी बहिरवाडी,कोंडकेवाडी, बांदलवाडी परिसरातील काही भात खाचरात पाणी आले आहे तेथील शेतकऱ्यांनी भात लागवडीला सुरवात केली आहे.काळदरी, धनकवडी, दवणेवाडी,मांढर परिसरातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत असून भात लागवडी खोळंबल्या आहेत. या परिसरात इंद्रायणी भाता बरोबर संकरीत वाणांची लागवड केली जाते संकरी वाणांचा उत्पादन कालावधी कमी असतो पाऊस लांबल्याने भात रोपे लावणी बाहेर चालली आहेत. तरवे टाकल्यावर पावसाने दडी मारल्यामुळे भात रोपांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असल्याचे अंकुश परखंडे यांनी सांगितले. पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे भात रोपांची उंची खुंटली आहे याचा परिणाम उत्पादन होणार आहे.भात लागवड करताना रोपांची उंची कमी असल्याने पाण्यात रोप दिसत नसल्याचे महिला शेतकरी सुनिता भगत यांनी सांगितले यावेळी पुजा चिव्हे, संगिता चिव्हे, रुपाली पांगसे मंगल कोकरे आदी भात लागवड करणाऱ्या महिला शेतकरी उपस्थित होत्या.काळदरी खोऱ्यात भुईमूग, नाचणी, बाजरी आदी खरीपातील पिके जोमा पिकांच्या खुरपणीची कामे पूर्ण झाली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

SCROLL FOR NEXT