Waiting for crop loan in Nashik district
Waiting for crop loan in Nashik district 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात पीककर्जाची प्रतीक्षाच

टीम अॅग्रोवन

नाशिक : जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी पीक कर्जवाटपाचा १४२० कोटींचा लक्ष्यांक अग्रणी बँकेकडून देण्यात आला. मात्र, कर्ज वितरण अद्याप थंडच आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे (ता.१५) अखेर अवघे ४१० कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. त्यामुळे कर्ज वितरणाची गाडी २८ टक्क्यांवरच अडली आहे. भांडवल नसल्याने अनेक शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेतच असल्याचे चित्र आहे. 

खरिपाच्या अखेरीस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना भांडवलाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. पर्यायी अनेक शेतकऱ्यांनी बँकेची वाट धरली. मात्र काही बँकांनी रब्बी पीककर्ज नाकारल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी भांडवल नसल्याने अडचणीत सापडला आहे. 

अग्रणी बँकेने सर्वाधिक लक्ष्यांक राष्ट्रीयकृत बँकांना, तर त्याखालोखाल शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेला दिला. त्यानंतर खासगी बँकांना आहे. तर ग्रामीण बँकेला लक्ष्यांक किरकोळ आहे. त्यात कर्जमुक्ती योजनेतील अनेक शेतकऱ्यांना वितरणात डावलले गेल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

रब्बी पीक कर्जवाटप १ ऑक्टोबरपासून सुरू झाले. ३ महिने उलटून गेल्यानंतरही वितरण अत्यंत कमी आहे. त्यामुळे नुसत्या लक्ष्यांकाच्या आकडेवारी जाहीर झाल्या. मात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात पीककर्ज मिळणार का?असा सवाल शेतकरी करत आहेत. 

पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून भांडवलाची गरज आहे. मात्र बँकांकडून कर्जवाटप करताना नाकारले जाते. ठराविक खातेदारांचे नवे जुने प्रकरण केले जाते. नवीन इच्छुक शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका पीककर्ज देत नाहीत, तर जिल्हा बँकाही उभं करत नाही. कर्जमुक्तीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना डावलले जात आहे. - प्रदीप देवरे, शेतकरी, वाजगाव, ता. देवळा

कर्ज मागणी मर्यादित आहे. मागणीप्रमाणे  कर्ज देण्यात येत आहे. अधिक प्रमाणावर पेरण्या पूर्ण झाल्या. मागील वर्षाच्या तुलनेत वाटप समाधानकारक आहे.  - ए. शेखर, महाव्यवस्थापक, अग्रणी बँक

जिल्हा बँकेकडून वितरण करण्यासाठी पैसे येत नाहीत, असे तालुकास्तरीय शाखेचे अधिकारी सांगतात. त्यामुळे मागणी करूनही रब्बीसाठी पीककर्ज मिळाले नाही. कर्ज मिळणार नाही, असेच बँकेचे अधिकारी सांगतात. प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. - नाना बच्छाव, प्रदेश कार्याध्यक्ष, स्वाभिमानी संघर्ष संघटना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : उन्हाचा चटका असह्य; राज्यातील काही भागात आज पावसाचा अंदाज कायम

Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Agriculture Irrigation : निळवंडेचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको ः आमदार तनपुरे

Crop Loan : जेवढे भरले तितकेच नव्याने पीककर्ज!

Canal Work : गोसेखुर्द कालव्याचे काम रखडले

SCROLL FOR NEXT