Wafsa did not come in Maan taluka and no sowing took place
Wafsa did not come in Maan taluka and no sowing took place 
मुख्य बातम्या

माण तालुक्यात वाफसा येईना अन् पेरणी होईना

टीम अॅग्रोवन

बिजवडी, जि. सातारा : माण तालुक्यातील मागील दोन-तीन वर्षांत जलसंधारणाची कामे झाली. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यात शेतीत आमूलाग्र बदल घडले. परंतु, यंदा परतीच्या पावसाने या दुष्काळी भागात हाहाकार माजवीत शेतीचे मोठे नुकसान केले. सतत संकटाचे घाव सोसणारा बळिराजा देशोधडीला लागला. अजूनही शेतात पाणी असल्याने पेरण्याचे नियोजन खोळंबले आहे. `वाफसा येईना अन् पेरणीचे ग्रहण सुटेना’, अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. 

गेल्या दोन वर्षांपासून तालुक्‍यात पावसाचे प्रमाण वाढले. जलसंधारणाच्या कामामुळे पडणारे पाणी अडवून मुरले गेले. पाणीपातळीत वाढ झाली. त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. शेतकरी आता कुठे यातून उभा राहत असताना पुन्हा एकदा अतिवृष्टीचे संकट आले. या संकटात खरीप हंगामाच्या शेवटी अतिवृष्टी झाल्याने हातातोंडाशी आलेलं पीक परतीच्या पावसाने हिरावले. त्यामुळे बळिराजा हतबल झाला. 

कांदा, बाजरी, मका, घेवडा व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले. खरीप पिकांचे झालेले नुकसान व शेतीची बिघडलेली गणिते सुधारण्यासाठी पुन्हा मोठ्या आशेने रब्बीच्या भरवशावर अवलंबून राहिला. ऑक्‍टोबरमध्ये रब्बीची पेरणी होणे गरजेचे होते.

पाऊस थांबून १५ दिवस झाले. परंतु, शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वापसा येत नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसामुळे खरीप वाया गेला आणि उशिरा पेरणीमुळे रब्बी हंगामही हातचा जाण्याच्या भीतीने बळिराजा धास्तावला आहे. 

ज्वारीची पेरणी केली होती. मात्र, अतिपावसामुळे दुबार पेरणीचे संकट ओढावले. अजूनही शेतात पाणी आहे. त्यामुळे मशागत करता येत नाही. आणखी किमान १५ दिवस तरी पेरणी करता येणार नाही.  - अर्जुन अवघडे, प्रगतशील शेतकरी, वावरहिरे, ता. माण.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT