राज्य समितीची मूल्यांकनासाठी गावांना भेट
राज्य समितीची मूल्यांकनासाठी गावांना भेट 
मुख्य बातम्या

राज्य समितीची मूल्यांकनासाठी पांगरा, बकापूर गावांना भेट

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानअंतर्गत आदर्श ग्राम स्पर्धेसाठी राज्यस्तरीय समितीने औरंगाबाद जिल्ह्यातील पांगरा व बकापूर या दोन गावांना गुरुवारी (ता. ५) मूल्यांकनाच्या दृष्टीने भेट देऊन पाहणी केली. 

आदर्श गाव संकल्प व प्रकल्प महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये जलसंधारण व रोहयो सचिव प्रमोद शिंदे, कृषी सहसंचालक ज्ञानेश्वर बोटे, आदर्श ग्राम उपसंचालक गणेश तांबे, व्हीएसटीएफ अभियान व्यवस्थापक प्रफुल्ल रंगारी, दिलीपसिंह बायस, व्हीएसटीएफ अभियान सहयोगी स्वाती मेनेसेस, निकेश आमने आदींचा सहभाग होता. 

राज्यातील एक हजार गावे सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान सुरू झाले आहे. या अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यातील १२ जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी आदर्श ग्राम स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. जिल्हा समितीने जिल्हास्तरावर मूल्यांकन करून राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी गावांची माहिती पाठविली आहे.

यासंदर्भात १४ ऑगस्टला आदर्श गाव संकल्पना व प्रकल्प पुणे येथे राज्यस्तरीय समितीच्या बैठकीमध्ये अधिक मूल्यांकन मिळालेल्या दोन गावांना भेटी देऊन मूल्यांकन देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार २२ ऑगस्ट ते ९ सप्टेबरदरम्यान राज्यस्तरीय समितीच्या गावभेटीचे नियोजन करण्यात आले होते. या भेटीअंती समिती आपले अंतिम मूल्यांकन करणार आहे. 

या वेळी पोपटराव पवार यांनी थेट ग्रामस्थांशी संवाद साधला. बकापूर येथील भेटीवेळी फळबागतज्ज्ञ डॉ. भगवानराव कापसे, औरंगाबादचे तालुका कृषी अधिकारी विश्वास जाधव, कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख दिप्ती पाटगावकर, व्हीएसटीएफचे जिल्हा कार्यकारी प्रवीण पिंजरकर, मंडळ कृषी अधिकारी आडे आदींची उपस्थिती होती. 

पांगरा येथे पैठणचे तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भूते, मंडळ कृषी अधिकारी रामनाथ कारले, कृषी पर्यवेक्षक तळपे, कृषी सहायक एस. पी. चव्हाण व प्रमोद रोकडे यांची उपस्थिती होती. पांगरा येथे ग्रामसभा घेण्यात आली. या निमित्ताने गावातील विविध प्रगतीपर कामांची माहिती देण्यात आली. त्याची प्रत्यक्ष शहनिशा समितीने केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : धाराशिवमध्ये मोठी चुरस

Liger Pesticide : ‘जीएसपी’चे कीटकनाशक ‘लायगर’ बाजारात

Forest Fire : उत्तराखंडच्या जंगलात आगीचे लोळ; मुख्यमंत्री धामींच्या लष्कराची मदत घेण्याच्या प्रशासनाला सूचना

Crop Varieties Conservation : स्थानिक जातींच्या संवर्धनासाठी आधुनिक बियाणे बॅंक

Agriculture Technology : गाईच्या शेणापासून बनविले ‘गोबायर’

SCROLL FOR NEXT