मेळघाटातील गावाला  होणार सौरऊर्जेचा पुरवठा To the village of Melghat There will be supply of solar energy
मेळघाटातील गावाला  होणार सौरऊर्जेचा पुरवठा To the village of Melghat There will be supply of solar energy 
मुख्य बातम्या

मेळघाटातील गावाला होणार सौरऊर्जेचा पुरवठा

टीम अॅग्रोवन

अमरावती : धारणी तालुक्यातील चोपण या दुर्गम गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातर्फे ‘मेडा’च्या सहकार्याने सौर ऊर्जाधारित पारेषण प्रकल्प आकारास आला असून, लवकरच तो कार्यान्वित होईल. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतीच या प्रकल्पाची तपासणी केली. या प्रकारे संपूर्ण गावाला वीज उपलब्ध करून देणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रकल्प आहे. जिल्ह्यात मेळघाटातील धारणी तालुक्यातील चौराकुंड ग्रामपंचायतीअंतर्गत चोपण हे दुर्गम गाव आहे. तेथील १६१ घरांना या प्रकल्पामुळे वीज जोडणी मिळणार आहे. मेळघाटातील दुर्गम भागात विद्युतीकरणासाठी वन, ऊर्जा व विविध विभागांच्या समन्वयातून प्रयत्न होतच आहेत. मात्र, शक्य तिथे पारंपरिक वीजपुरवठ्याबरोबरच अपारंपरिक ऊर्जा सुविधांबाबतच्या योजनाही भरीवपणे राबवाव्यात, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. त्या बाबत प्रशासनातर्फे ‘मेडा’च्या माध्यमातून ठिकठिकाणी सौर ऊर्जाधारित प्रकल्प राबविण्याचा निर्णय आला आहे. मेळघाटातील चोपण या दुर्गम गावात प्रकल्प आकारास आला आहे. त्याची तपासणी व आवश्यक बाबींच्या पूर्ततेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी उपस्थित होत्या. वीज नसलेल्या गावांसाठी हा सोलर मायक्रो ग्रीड प्रकल्प राबवला जातो. त्याद्वारे गावाला २४ तास वीजपुरवठा शक्य होतो. चोपण येथील प्रकल्प २४ किलोवॉट क्षमतेचा आहे. त्याची प्रकल्प किंमत ४२.४४ लाख असून, धारणीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे ‘मेडा’ला सहकार्य लाभले आहे.  सौर ऊर्जेवरती संपूर्ण गावामध्ये पथदिवे व घरांमध्ये वीजजोडणी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT