झेंडूच्या दराचे ‘विघ्न` गणेशोत्सवातही कायम
झेंडूच्या दराचे ‘विघ्न` गणेशोत्सवातही कायम 
मुख्य बातम्या

झेंडूच्या दराचे ‘विघ्न` गणेशोत्सवातही कायम

Raj Chougule

कोल्हापूर : झेंडूच्या घसरत्या दराला गणेशोत्सवातही फारसे तारले नसल्याची स्थिती आहे. प्रचंड मागणी असलेल्या गणेशोत्सव काळातही झेंडूला किलोला केवळ ३० ते ४० रुपये इतका मर्यादित दर मिळत असल्याने झेंडू  उत्पादकांचा पूरता अपेक्षा भंग झाला आहे. दादरच्या फुलबाजारात जुन्नर, नाशिक, नारायणगाव आदी ठिकाणांहूनही फुलांच्या आवकेत वाढ झाली आहे. यामुळे झेंडूच्या दराचे ‘विघ्न` गणेशोत्सवातही कायम असल्याचे चित्र आहे.

निराशादायक हंगाम जुलै महिन्यापर्यंत फारशी मागणी नसल्याने झेंडूचे दर मंदीतच होते. ऑगस्टच्या मध्यापर्यंत दर दहा ते पंधरा रुपये प्रतिकिलो राहिले. आॅगस्टनंतर राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू झाला. यामुळे राज्यभरातील फुलांचे नुकसान झाले. अचानक आवक कमी झाल्याने दरात काही काळ वाढ झाली. ऑगस्ट अखेरपर्यंत ४० ते ५० रुपये दर होते.

दरात फारसा उठाव नाही गणेशोत्सवामध्ये मुंबईत झेंडूची मागणी वाढते. यामुळे दर चांगले रहातील, असा कयास उत्पादकांबरोबर फुल विक्रेत्यांचाही होता. परंतु, सप्टेंबरच्या सुरवातीपासून दरात पडझड सुरू झाली. गणेशोत्सव सुरू होण्याच्या अगोदर चार दिवसांपर्यंत झेंडूची विक्री किलोस २० ते २५ रुपयांनी झाली. गणेशोत्सवासाठी मागणी सुरू झाल्यानंतर उत्पादकांनी फुलांची काढणी वेगाने सुरू केली. परंतु, दादरच्या बाजारात राज्यातील फूल उत्पादक पट्यातून फुलांची आवक सुरू झाल्याने आवक वाढलेलीच दिसली. सध्याचे दरच दिवाळीपर्यंत कायम राहू शकतील, अशी शक्‍यता व्यापारी सूत्रांनी व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT