अकोल्यात भाजीबाजार आता पहाटे  तीन ते सकाळी सहापर्यंतच  The vegetable market in Akola is now morning Only from three to six in the morning
 अकोल्यात भाजीबाजार आता पहाटे  तीन ते सकाळी सहापर्यंतच  The vegetable market in Akola is now morning Only from three to six in the morning 
मुख्य बातम्या

अकोल्यात भाजीबाजार आता पहाटे 3 ते सकाळी सहापर्यंतच 

टीम अॅग्रोवन

अकोला : कोरोना रोखण्यासाठी होत असलेल्या उपाययोजनांचा फटका येथील भाजीपाला बाजारालाही बसला आहे. प्रशासनाने एक मार्चपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला असून, या काळात भाजीबाजारात पहाटे तीन ते सकाळी सहा या वेळेतच व्यवहार करण्याची मुभा दिली आहे. 

अकोल्यातील भाजीबाजारात स्थानिकसह लगतचे जिल्हे, खानदेश, मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात आवक होत असते. दररोज लाखो रुपयांची उलाढाल होते. आलेला सर्व माल विक्रीची शाश्‍वती असल्याने या ठिकाणी दूरवरच्या भागातून शेतकरी माल विक्रीला आणत असतात. कोरोनाच्या या नवीन लॉकलाऊनच्या नियमामध्ये ठोक भाजीबाजाराला केवळ तीन तासांची मुभा देण्यात आली आहे. या प्रकारामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात शेतकऱ्यांना भाजीपाला विकताना अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला होता. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अमरावती विभागीय आयुक्तांनी विभागातील रविवारी नव्याने नियम जाहीर केले. सुधारित प्रतिबंधात्मक उपाययोजनांनुसार आता अकोला जिल्ह्याकरिता नवीन नियमावली लावण्यात आली. अकोला महानगरपालिका क्षेत्रासह अकोट व मूर्तिजापूर नगरपालिका क्षेत्रामध्ये मंगळवार (ता.२३) पासून ते १ मार्चपर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. तिन्ही प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जीवनावश्यक वस्तूची दुकाने सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. इतर सर्व दुकाने लॉकडाउन काळात बंद राहणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत सुरू राहणार आहेत. 

असे असतील लॉकडाउनमधील नवे नियम  अकोल्यातील भाजीबाजार पहाटे ३ ते सकाळी ६ वेळेत  मंडईमध्ये किरकोळ विक्रेत्यांनाच प्रवेश  जे उद्योग सुरू आहेत तेथील कामकाजास परवानगी  शासकीय कार्यालयात १५ टक्के उपस्थिती  खासगी कार्यालयात १५ पेक्षा कमी उपस्थिती  हॉटेल्स सुरू राहतील, मात्र पार्सल सुविधा  लग्न समारंभात २५ जणांना परवानगी  माल वाहतुकीला कुठलेही निर्बंध नाहीत  शाळा, महाविद्यालये बंद  समारंभांनाही परवानगी नाही 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

SCROLL FOR NEXT