वान’च्या पाण्यावर पहिला हक्क अामचा
वान’च्या पाण्यावर पहिला हक्क अामचा  
मुख्य बातम्या

‘वान’च्या पाण्यावर पहिला हक्क अामचा

टीम अॅग्रोवन

अकोला : अकोला व बुलडाणा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वान प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी अारक्षित न करता शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळावे, अशी मागणी तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ६) पालकमंत्र्यांकडे केली. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा जनता दरबार अायोजित करण्यात अाला होता. या वेळी तेल्हारा (जि. अकोला) व संग्रामपूर (जि. बुलडाणा) तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागणीचे निवेदन दिले.   याबाबत शेतकऱ्यांनी म्हटले, की वान प्रकल्पातील पाणी अमृत योजनेअंतर्गत अकोला शहरासाठी अारक्षित करण्याच्या हालचाली सुरू अाहेत. वास्तविक तेल्हारा व संग्रामपूर हे दोन्ही तालुके अादिवासी भागात असून त्या ठिकाणी कुठलेही कारखाने, उद्योग नाहीत. या प्रकल्पाशिवाय इतर दुसरा कुठलाही प्रकल्प नाही. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या अाहेत. यापूर्वी वान प्रकल्पातील ४७ टक्के पाणी शासनाने शेगाव, जळगाव जामोद, तेल्हारा, अकोट या तालुक्यातील गावांसाठी अारक्षित केले अाहे. प्रकल्पात गाळ साचलेला असून, बाष्पीभवन व गळतीमुळे पाणी कमी होते. त्यामुळे सिंचनासाठी २५ते ३० टक्केच पाणी उपलब्ध अाहे. सिंचनात अडचणी येतात. त्यामुळे शासनाने अकोलासाठी इतर पर्यायाने पाणी अाणावे. शासनाच्या प्रचलित नियमानुसार फक्त प्रकल्पातील १५ टक्के पाणीच पिण्यासाठी अारक्षित करावे व उर्वरित सिंचनासाठी ठेवणे गरजेचे असते; मात्र या प्रकल्पातील १०० टक्के पाणी अारक्षित केले जात अाहे. त्यामुळे हा अन्याय दूर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. 

शेतकरी नेते ललित बहाळे, शेतकरी संघटनेचे तेल्हारा तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत कौठकर, अकोला जिल्हा युवा अाघाडीप्रमुख अविनाश नाकट, गोपाल भाकरे, सचिन धोटे, दिलीप वानखडे, दादा टोहरे, अंनता तलोकार, दिनेश गिर, गंगोत्री पाणीवाटप संस्थेचे (वाडी) अध्यक्ष तुळशीराम मंत्री, विक्रांत बोंद्रे, राजेश ढोले, मनोहर बाजोड, अरविंद तिवाणे, समाधान साबडे, गौरव डेरे, विठ्ठल बजोट, विठ्ठल तिवाणे, नितीन वाघ, नीलेश वाकोडे, विनोद भोगले, दीपक टोहरे, ओम प्रकाश राठी, प्रल्हाद वाघ, विलास ताथोड, श्याम मूर्तीजापूरकर, मनोहर बाजोडकर, सतीश ऊंबरकर अादींनी पालकमंत्र्यांना निवेदन देत मुद्यांवर चर्चा केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT