कृषी विज्ञान केंद्र मालेगावकडून राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लसीकरण
कृषी विज्ञान केंद्र मालेगावकडून राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लसीकरण 
मुख्य बातम्या

कृषी विज्ञान केंद्र मालेगावकडून राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत लसीकरण

टीम अॅग्रोवन

नाशिक : कृषी विज्ञान केंद्र, मालेगाव महाराष्ट्र शासन, पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन झालेल्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत -लाळ्या खुरकत, ब्रुसेलेसिस आणि राष्ट्रीय कृत्रिम रेतन कार्यक्रमाचे आयोजन मालेगाव तालुक्यातील जळगाव (निंबायती) येथे बुधवारी (ता. ११) करण्यात आले.  दरम्यान, कार्यक्रमाची सुरवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मथुरा (उत्तरप्रदेश) येथील उद्‌घाटनीय मार्गदर्शनाचे थेट प्रक्षेपण उपस्थित शेतकऱ्यांना दाखवून करण्यात आली. त्यानंतर गावातील जनावरांना लाळ्या खुरकत रोगाचे लसीकरण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात सहायक आयुक्त (पशुसंवर्धन) डॉ. कदम यांनी लाळ्या खुरकत, ब्रुसेलेसिस आणि कृत्रिम रेतन या बाबत मार्गदर्शन केले. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना, पंतप्रधान शेतकरी मानधन योजना याबाबत कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अमित पाटील यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पशुविद्यान आणि दुग्धव्यवसाय विषय विशेषज्ञ संदीप नेरकर यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : धाराशिवमध्ये मोठी चुरस

Liger Pesticide : ‘जीएसपी’चे कीटकनाशक ‘लायगर’ बाजारात

Forest Fire : उत्तराखंडच्या जंगलात आगीचे लोळ; मुख्यमंत्री धामींच्या लष्कराची मदत घेण्याच्या प्रशासनाला सूचना

Crop Varieties Conservation : स्थानिक जातींच्या संवर्धनासाठी आधुनिक बियाणे बॅंक

Agriculture Technology : गाईच्या शेणापासून बनविले ‘गोबायर’

SCROLL FOR NEXT