वाटेगाव-सुरूल शाखेने वेगळेपण जपले ः मोरे
वाटेगाव-सुरूल शाखेने वेगळेपण जपले ः मोरे  
मुख्य बातम्या

'वाटेगाव-सुरूल ही देशाच्या सहकार क्षेत्रातील पहिली शाखा'

टीम अॅग्रोवन

इस्लामपूर, जि. सांगली ः वाटेगाव-सुरूल शाखा ही देशाच्या सहकार क्षेत्रातील पहिली शाखा असून, या शाखेने १५ वर्षांत यशस्वी गाळप करीत आपले वेगळेपण जपले असल्याचे गौरवोद्गार कारखान्याचे संचालक दादासो मोरे यांनी काढले.

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वाटेगाव - सुरूल  शाखेमध्ये श्री. मोरे यांच्या हस्ते रोलर  पूजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी कारखान्याचे संचालक संचालक जे. वाय. पाटील, सचिव प्रताप पाटील, चीफ इंजिनिअर संताजी चव्हाण, चीफ केमिस्ट संभाजी सावंत प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

श्री. मोरे पुढे म्हणाले, की माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांच्या दूरदृष्टीतून ही शाखा उभी राहिली आहे. या शाखेतील ऑफ सिझनची कामे गतीने सुरू आहेत.  या शाखेसाठी या गळीत हंगामासाठी साडेसात हजार एकर उसाची नोंद झाली आहे. वाहतूक व तोडणी करार पूर्ण झाले आहेत.

सचिव प्रताप पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. याप्रसंगी संजय मोरे रेठरे हरणाक्ष, आकाराम साळुंखे सुरूल यांच्यासह अधिकारी, खातेप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. चीफ इंजिनिअर संताजी चव्हाण यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT