Useful in Marathwada Water is only 65.80 percent
Useful in Marathwada Water is only 65.80 percent 
मुख्य बातम्या

मराठवाड्यात उपयुक्त पाणी ६५.८० टक्केच

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा तीन महिन्यात जवळपास २५ टक्‍क्‍यांनी घटला आहे. सर्व प्रकल्पात आजघडीला ६५.८० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली.

४  डिसेंबर २०२० अखेर मराठवाड्यातील ८७६ लघु-मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ९०.८५ टक्के होता. त्यामध्ये मोठ्या ११ प्रकल्पातील ९७.२० टक्के उपयुक्त पाणीसाठ्यासह ७५ मध्यम प्रकल्पांतील ८९ टक्के, ७५२ लघु प्रकल्पातील ७४ टक्के, गोदावरी नदीवरील बंधाऱ्यांमधील ८० टक्के, तर तेरणा मांजरा, रेना नदीवरील २५ बंधाऱ्यांमधील ९३ टक्के उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश होता. 

एक जानेवारी २०२१ अखेर मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांमधील उपयुक्त पाणी ८२ टक्क्यांवर होते. फेब्रुवारीअखेर ८७६ प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ६२. ८० टक्‍क्‍यांवर आला आहे. आजघडीला उपलब्ध पाणीसाठ्यात मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांतील ७५.६८ टक्के उपयुक्त पाणीसाठ्यासह मध्यम ७५ प्रकल्पांमधील ५८.८ टक्के, ७५२ लघु प्रकल्पांतील ४३.१० टक्के, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यांमधील ५७.४१ टक्के, तर तेरणा मांजरा नदीवरील २५ बंधाऱ्यांमधील ३४.७० टक्के उपयुक्त पाणी आहे. 

५५ प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली

मराठवाड्यातील एका मध्यम प्रकल्पासह ५४ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यात लातूर जिल्ह्यातील एका मध्यम प्रकल्पासह  औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी ४, जालन्यातील ७, बीडमधील १०, लातूरमधील व उस्मानाबादमधील प्रत्येकी १४, परभणीतील एका लघू प्रकल्पाचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

SCROLL FOR NEXT