मसाला, सुगंधी वनस्पतीवर्गीय पिकांची लागवड फायदेशीर
मसाला, सुगंधी वनस्पतीवर्गीय पिकांची लागवड फायदेशीर 
मुख्य बातम्या

मसाला, सुगंधी वनस्पतीवर्गीय पिकांची लागवड फायदेशीर

टीम अॅग्रोवन

अकोला  ः ‘‘आपल्याकडील हवामान, जमीन हे मसाला, सुगंधीवर्गीय वनस्पती पिकांसाठी पोषक आहे. या पिकांना दरही चांगला मिळतो. ही संधी पाहता शेतकऱ्यांनी पीकबदल करणे आता काळाची गरज झाली आहे. या संधीचा फायदा घेतला पाहिजे. यासाठी जे ज्ञान, तंत्र लागेल ते देण्यासाठी विद्यापीठ तयार आहे,’’ असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले. येथे मंगळवार (ता.२५) व बुधवार (ता.२६) असा दोन दिवसीय ‘शाश्वत शेतीसाठी मसाला व सुगंधी वनस्पती पिकांचे अद्ययावत उत्पादन तंत्रज्ञान’ या विषयावर राज्यस्तरीय शेतकरी चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. भाले बोलत होते. व्यासपीठावर विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. एम. मानकर, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. पी. के. नागरे, विभागप्रमुख डॉ. ए. एम. सोनकांबळे, सहायक अधिष्ठाता डॉ. वाय. बी. तायडे, महिला शेतकरी प्रतिनिधी शोभाताई गायधने यांची उपस्थिती होती.  डॉ. भाले म्हणाले, ‘‘जगात १०९ मसालावर्गीय पिके घेतली जातात. त्यांपैकी जवळपास ७५ पिके आपल्या देशात पिकतात. ही पैसा देणारी, कमी कालावधीची पिके आहेत. याद्वारे शेतकरी आपली आर्थिक स्थिती सुधारू शकतो. यादृष्टीने सहकार्यासाठी, मार्गदर्शनासाठी विद्यापीठ सदैव सोबत राहील,’’ असे आश्‍वासन दिले.  डॉ. खर्चे म्हणाले, ‘‘मागील दहा ते बारा वर्षांच्या काळात राज्यात मसालावर्गीय पिकांची क्षेत्र वाढ होत आहे. ही बाब चांगली आहे.’’ डॉ. मानकर म्हणाले, ‘‘शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ महत्त्वाची आहे. त्यामुळे कमी कालावधीत व मागणी असलेल्या पिकांचे उत्पादन काढावे म्हणजे चांगले दर मिळतील.’’  डॉ. नागरे म्हणाले, ‘‘कालिकत येथील केंद्राच्या पाठबळामुळे अनेक गोष्टी करणे शक्य झाले. मागील काही वर्षात विद्यापीठाने यावर चांगले काम केले. डॉ. विजय काळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डॉ. ए. एम. सोनकांबळे यांनी आभार मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

SCROLL FOR NEXT