cotton seed
cotton seed 
मुख्य बातम्या

एचटीबीटीविरोधात गुप्तचर यंत्रणा वापरा : कृषी विभाग

टीम अॅग्रोवन

पुणे: राज्यात एचटीबीटी बियाण्यांचा शिरकाव रोखण्यासाठी गुप्तचर यंत्रणेचा वापर करावा, अशी सूचना कृषी विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. खरीप नियोजनात लॉकडाऊनमुळे आधीच बियाणे कंपन्या आणि शेतकरी विविध समस्यांचा सामना करीत आहेत. त्यात पुन्हा एचटीबीटी (जनुकीय परावर्तित तणनाशक सहनशील बियाणे) संकट उफाळून येवू नये यासाठी कृषी विभागाने थेट जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठविले आहे.   ‘‘राज्याचा खरीप हंगाम लवकरच सुरू होत आहे. त्यामुळे परराज्यातून येणारे एचटीबीटी रोखावे लागेल. सीमा भागातील जिल्ह्यांमध्ये नाकेबंदी करावी. तसेच, पोलीस प्रशासन आणि कृषी विभागाच्या सहकार्याने शोध मोहिमा राबवावी,’’ असा आग्रह कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे धरला आहे.  गेल्या हंगामात राज्यात एचटीबीटीच्या विरोधात कृषी विभागाने धडाकेबाज कारवाई केली होती. एचटीबीटी टोळांच्या विरोधात पोलिसांनी २८ ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल केल्याने टोळ्या हादरल्या होत्या. ‘‘एचटीबीटीविरोधी मोहिमांमध्ये गेल्या हंगामात एक कोटी रुपये किमतीची बियाणे पकडली होती. जनुकीय परावर्तित बियाण्यांच्या विरोधात कारवाईचे अधिकार जिल्हास्तरीय जैव तंत्रज्ञान समितीला आहेत. त्यामुळे अशा मोहिमा यंदाही काढाव्यात,’’ असे जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्रात सूचित करण्यात आले आहे. कृषी विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘एचटीबीटीचा विषय हा जैव तंत्रज्ञान समितीच्या अखत्यारीत येतो. या समितीचे अध्यक्षपद थेट जिल्हाधिकाऱ्याकडे असते. त्यामुळे अनधिकृत जनुकीय परावर्तित बियाण्यांच्या वादात अकारण कृषी विभागाला ओढले जाते.’’ दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी जप्त करण्यात आलेल्या २५ लाख रुपयांच्या एचटीबीटी बियाण्यांचे धागेदोर तेलंगणात असल्याचे सांगण्यात आले. या टोळीचा सूत्रधार पोलिसांना अद्याप सापडलेला नाही.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT