इंधन खर्च बचतीसाठी बैलचलित अवजारे वापरा ः डाॅ. ढवण
इंधन खर्च बचतीसाठी बैलचलित अवजारे वापरा ः डाॅ. ढवण 
मुख्य बातम्या

इंधन खर्च बचतीसाठी बैलचलित अवजारे वापरा ः डाॅ. ढवण

टीम अॅग्रोवन

परभणी ः इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी तसेच पशुशक्तीचा योग्य वापर करण्यासाठी शेतकऱ्यांनी बैलचलित सुधारित कृषी अवजारांचा वापर करावा. यामुळे मजुरांवरील खर्चदेखील कमी होण्यास मदत होईल. त्यासाठी बैलचलित कृषी अवजारांचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील पशुशक्तीचा योग्य वापर योजनेअंतर्गत गुरुवारी (ता. २०) मराठवाडा, विदर्भ, खानदेशातील शेतकऱ्यांना बैलचलित अवजारांचे वाटप कार्यक्रमामध्ये डॉ. ढवण बोलत होते.

या वेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव रणजित पाटील, नियंत्रक एस. एन. राठोड, प्राचार्य डॉ. उदय खोडके, ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. एस. पी. म्हेत्रे, प्रा. स्मिता सोलंकी, डॉ. आर. टी. रामटेके, प्रा. डी. डी. टेकाळे, प्रा. पी. ए. मुंढे, डॉ. सी. बी. लटपटे, अजय वाघमारे आदी उपस्थित होते.डॉ. ढवण पुढे म्हणाले, ‘‘मजुराची समस्या तसेच उत्पादन खर्च कृषी यांत्रिकीकरणास चालना देणे गरज आहे. विविध संशोधन केंद्राच्या माध्यमातून अवजारांचा प्रचार, प्रसार करावा.’’ 

डॉ. वासकर म्हणाले, ‘‘सौरऊर्जेचा वापर करून अवजारांची कार्यक्षमता वाढवावी.’’ या वेळी मराठवाड्यातील मंगळरुळ (जि. परभणी), वाई (ता. कळमनुरी, जि. हिंगोली), विदर्भातील केषपुरवा (ता. चिखलदरा, जि. अमरावती), तळेगाव (रघोजी) (ता. आर्वी, जि. वर्धा), धानोरा जंगम (ता. नांदुरा, जि. बुलडाणा), करडा (ता. रिसोड, जि. वाशीम), खानदेशातील तळवीपाडा (ता. नवापूर, जि. नंदुरबार) या गावातील शेतकऱ्यांना बैलचलित सौर फवारणी यंत्र, बहुविध टोकण यंत्र, क्रीडा टोकन यंत्र (३ फणी), लाकडी जू, हळद काढणी यंत्र (सरी वरंबा पद्धतीकरिता, उसामध्ये माती लावणी यंत्र, एक बैलचलित सरी पाडणे यंत्र, एक बैलचलित कोळपे, तीन पासेसचे कोळपे (बीबीएफ साठी), धसकटे गोळा करण्याचे यंत्र आदी अवजारांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक सोलंकी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी केले. तर डॉ. टेकाळे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT