Use Agricultural University Technology: Dr. ढवण
Use Agricultural University Technology: Dr. ढवण 
मुख्य बातम्या

कृषी विद्यापीठ तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. ढवण

टीम अॅग्रोवन

नाशिक : शेतकऱ्यांच्या विकासासाठी सातत्याने कृषी संशोधन करत आहे. या केंद्रावर कांदा व लसूण पिकांचे संशोधन सुरू असून बीजोत्पादनही घेतले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी विद्यापीठाच्या बियाण्यांचा वापर करताना सोबतीला पिकाच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची जोड द्यावी,  असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथील कांदा व द्राक्ष संशोधन केंद्राला डॉ. ढवण यांनी भेट देत पाहणी केली. या भेटीदरम्यान कुलगुरूंनी प्रक्षेत्राची पाहणी करून पिकांबाबत माहिती घेतली. केंद्राचे प्रमुख डॉ. जितेंद्र ढेमरे यांनी स्वागत केले. यावेळी विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरीचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. दत्तात्रय कुसळकर, कृषी संशोधन केंद्र निफाडचे गहू विशेषज्ञ डॉ. सुरेश दोडके यावेळी उपस्थित होते.

केंद्राचे प्रमुख डॉ. जितेंद्र यांनी १९५९ पासून संशोधन केंद्रावर झालेल्या संशोधन कार्याचा आढावा यावेळी मांडला. तसेच हे संशोधन केंद्र आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांविषयी माहिती दिली. केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. मंगेश बडगुजर, डॉ. राकेश सोनवणे, कमलाकर जाधव यांनी सुरू असलेल्या कांदा, लसूण व द्राक्ष संशोधनसंबंधी उपक्रमाची माहिती कुलगुरूंना दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT