Urea shortage in Deola taluka
Urea shortage in Deola taluka 
मुख्य बातम्या

देवळा तालुक्यात युरिया टंचाई

टीम अॅग्रोवन

नाशिक : देवळा तालुक्यात हंगामाच्या सुरुवातीला पेरणीसाठी चांगला पाऊस झाल्याने मका, बाजरी, भुईमूग व इतर पिकांची पेरणी केली. त्यामुळे सध्या शेतकरी पिकांच्या मशागतीत व्यग्र आहेत. या सर्व पिकांच्या वाढीसाठी खतांची आवश्यकता असते. तालुक्याच्या विविध भागांत युरिया उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना शोधाशोध करावी लागत आहे; तर काही ठिकाणी चढ्या दराने विक्री होत असल्याची ओरड शेतकरी करीत आहेत.

दोन आठवड्यांपासून विठेवाडी, सावकी, खामखेडे, वाजगाव, खर्डे, मेशी, डोंगरगाव, महालपाटणे, वासोळ, खालप, लोहोणेर गावात रासायनिक खतांच्या दुकानांमध्ये युरिया मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. त्यामुळे तालुक्याच्या वाट्याला आलेला युरिया गेला कुठे, असा सवाल बळिराजाला पडला आहे. वितरकाकडे माल आल्यास तो काही वेळातच संपतो. त्यामुळे विक्रेत्यांकडून तो गरजू शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही, असा मुद्दा सध्या उपस्थित होत आहे. 

खेड्यांतील लहान शेतकरी दोन तीन गोण्या खरेदी करण्यासाठी तालुक्यात युरिया घेण्यासाठी भाड्याचे वाहन करून जाऊ शकत नाही. तालुक्यातील वितरकांकडून खेड्यांतील विक्रेत्यांना पाहिजे त्या प्रमाणात युरिया उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे मागणी असूनही पुरवठा ठप्प झाला आहे. याबाबतीत तहसील व कृषी विभागानेही लक्ष घालण्याची गरज आहे. युरिया उपलब्ध असल्याचे आकडेवारीवरून कळते. मग शेतकऱ्यांना का मिळत नाही, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव यांनी उपस्थित केला आहे.

युरिया कुठेही उपलब्ध नाही. तालुक्याला १३५ टन युरिया प्राप्त झाला. मात्र तो मागणीच्या तुलनेत कमीच आहे. देवळा तालुक्याचा कोटा वाढवावा. तो अत्यल्प आहे; तरच ग्रामीण भागात तो पुरवठा करणे शक्य होईल. - जगदीश पवार, आरसीएफ वितरक, देवळा.

सध्या रॅक उपलब्ध नसल्याचे कारण दिले जाते. भाग बागायती असल्याने काही शेतकऱ्यांना मिळतो; तर काहींना तो उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना शोधाशोध करावी लागत आहे. एक महिन्यापासून माझ्याकडे माल उपलब्ध नाही. - अभिजित निकम, खत विक्रेते, विठेवाडी, ता. देवळा

युरियाचा पुरवठा सध्या कमीच आहे. सध्या उचल अधिक झाल्याने माल संपलेला आहे. सध्या फक्त उमराणे येथे विक्री सुरू आहे. - सचिन देवरे, तालुका कृषी अधिकारी, देवळा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

SCROLL FOR NEXT