Uploaded 88 thousand 559 loan accounts on the portal in Sangli district
Uploaded 88 thousand 559 loan accounts on the portal in Sangli district 
मुख्य बातम्या

सांगली : पोर्टलवर ८८ हजार ५५९ कर्जखाती अपलोड

टीम अॅग्रोवन

सांगली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८८ हजार ५५९ खाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. यापैकी ७६ हजार २७ खाती आधार प्रमाणीकरणासाठी प्राप्त झाली आहेत, अशी माहिती संबंधित विभागाच्या सूत्रांनी दिली.

या कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्हा बँकेकडील ७४ हजार ७२०, राष्ट्रीयीकृत बँकांकडील १३ हजार ८३९ अशी एकूण ८८ हजार ५५९ खाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. यापैकी आधार प्रमाणीकरणासाठी जिल्हा बँकेकडील ६५ हजार ९८८ व राष्ट्रीयीकृत बँकांकडील १० हजार ३९ खाती आधार प्रमाणीकरणासाठी प्राप्त झाली आहेत. प्रमाणीकरणास सुरुवातही झाली आहे.

सोमवारपर्यंत (ता. २) १५ हजार ३७० खात्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. यामध्ये जिल्हा बँकेकडील १३ हजार ८०२ व राष्ट्रीयीकृत बँकेकडील १ हजार ५६८ खात्यांचा समावेश आहे.

प्रमाणीकरण झालेल्या खात्यांपैकी नगण्य स्वरूपात तक्रारी येत आहेत. त्यापैकी बहुतांश तक्रारी या आधार लिंकबाबतच्या आहेत. त्यांचे निराकरण सुरू आहे. या तक्रारींचा निपटारा त्याच दिवशी करावा, अशा सूचना तहसीलदार आणि सहायक उपनिबंधक यांना दिल्या आहेत.

आधार प्रमाणीकरणासाठी जिल्ह्यातील ६०६ आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये (ASSK), तर जिल्हा बँकेच्या २१७ शाखांमध्ये बायोमेट्रिक मशिन दिली आहेत. पात्र शेतकऱ्यांनी बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्र या ठिकाणी त्वरित आधार प्रमाणीकरण करावे.

कर्जमाफी दृष्टिक्षेप

  • ८८ हजार ५५९ खाती पोर्टलवर अपलोड
  • ७६ हजार २७ खात्यांचे होणार आधार प्रमाणीकरण
  • १५ हजार ३७० खात्यांचे प्रमाणीकरण पूर्ण
  • ८२३ ठिकाणी बायोमेट्रिक मशिन्स सुविधा
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

    Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

    International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

    Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

    Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

    SCROLL FOR NEXT