रॅलीव्दारे शक्तीप्रदर्शन करताना उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले
रॅलीव्दारे शक्तीप्रदर्शन करताना उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले 
मुख्य बातम्या

शक्तिप्रदर्शनाने उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे यांचे उमेदवारी अर्ज दाखल

टीम अॅग्रोवन

सातारा   ः सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि सातारा-जावळी विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विजयी संकल्प रॅली काढत मंगळवारी (ता. १) आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले.

राजवाडा येथून या रॅलीस प्रारंभ झाला. रॅलीच्या अग्रभागी ढोल, ताशा वादक, त्यापाठोपाठ झांज पथक, शिंग, तुतारीवाले हे होते. मध्यभागी फुलांनी सजविलेल्या रथात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विठ्ठल-रुक्‍मणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, कांताताई नलावडे, भरत पाटील, अशोक गायकवाड, महेश शिंदे आदींसमवेत उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले विराजमान झाले होते.

रॅलीत सहभागी झालेले हजारो सर्मथक नेत्यांचा जयघोष करीत होते. पोवई नाक्‍यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सर्व नेत्यांनी अभिवादन केले. या रॅलीत दमयंतीराजे भोसले, वेदांतिकाराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम किशोर शिंदे आदी सहभागी झाले होते. पोवई नाक्‍यावर रॅलीच्या समारोपानंतर उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच प्रांताधिकारी कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT