गटशेती
गटशेती  
मुख्य बातम्या

गटशेती योजनेला दोन वर्षे मुदतवाढ

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्यातील गटशेतीला चालना देण्यासाठी अनुदान वाटपाची योजना अजून दोन वर्षे सुरू ठेवण्याचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. यामुळे शेतकरी गटांना किमान अडीचशे कोटी रुपये मिळण्याची चिन्हे आहेत.  राज्यात शेतजमिनीचे तुकडीकरण वेगाने होत आहे. प्रत्यक्ष कसण्यालायक क्षेत्रात होणारी घट आणि शेतीमधील खर्च अफाटपणे वाढत असल्यामुळे भविष्यात केवळ गटशेतीचा पर्याय हाती असेल, असे शासनाला वाटते. इस्त्राईलमधील शेती हे गटशेतीचे एक उत्तम मॉडेल डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. त्यासाठी योजनांची बांधणीदेखील शेतकरी गटांना केंद्रस्थानी ठेवून केली जात आहे.   गटशेतीला चालना देणारी योजना २०१८ मध्ये अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या टप्प्यात तीन ते चार कोटी रुपयांचे अनुदान वाटले गेले. गटशेतीसाठी प्रकल्पाच्या ६० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. २० टक्के निधी बॅंकांकडून कर्जरूपाने मिळत असल्याने गटांना केवळ २० टक्के निधी जमवून योजनेत भाग घेता येतो.   गटशेतीमधील प्रकल्पांना कर्जासाठी बॅंकांकडून आखडता हात घेतला जात असल्याचे लक्षात आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री तसेच मुख्य सचिवांनी बॅंकांना सूचना दिल्या. त्यामुळे बॅंकांकडून प्रकल्पांना मंजुरी मिळण्यास वेग मिळाला. परिणामी, शेतकरी गटांना दुसऱ्या वर्षी ७४ कोटींच्या पुढे अनुदान मिळाले. राज्यातील किमान २०० गटांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.  अशी आहे गटशेती योजना

  •   इस्त्राईलमधील मॉडेलच्या धर्तीवर गटशेती योजनेला प्रारंभ 
  •   २०१८ मध्ये पहिल्या टप्प्यात तीन ते चार कोटी रुपयांचे अनुदान वाटप
  •   गटशेतीसाठी प्रकल्पाच्या ६० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते
  •   दुसऱ्या वर्षी ७४ कोटींच्या पुढे अनुदान वाटप
  •   राज्यातील जवळपास २०० गटांना योजनेचा लाभ २५० कोटी वाटपाची शक्यता अनुदान वाटप आता २०२१ पर्यंत चालू ठेवण्यास मान्यता मिळाल्यामुळे तिसऱ्या वर्षी किमान १५० कोटींचे वाटप होऊ शकते, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. चौथ्या वर्षापर्यंत किमान २५० कोटी रुपये या योजनेतून गटशेतीला मिळू शकतात. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Market Rate : कांदा खरेदीचा मलिदा कोण खाणार ? कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमीच

    Kolhapur Farmers : कोल्हापुरातील शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार, भारत पाटणकर यांचा इशारा

    Crop Damage : केळी, पपईच्या नुकसानीची भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी

    Drought Condition : माथा ते पायथा जलसंधारणातून दुष्काळाच्या झळा कमी करणे शक्य

    Manjra Dam : ‘मांजरा’तील गाळाच्या आकड्यांचा घोळ

    SCROLL FOR NEXT