butterfly
butterfly  
मुख्य बातम्या

दोन नव्या फुलपाखरांना नागपुरात मिळाला अधिवास 

Vinod Ingole

नागपूर ः पर्यावरण संरक्षणासोबतच पीक परागीकरणात फुलपाखरांची मोलाची भूमिका राहते. नजीकच्या काळात लॉकडाउनमुळे प्रदूषणाची मात्रा काही अंशी कमी झाल्याने ऑरेंज सिटीत दोन नव्या प्रजातींच्या फुलपाखरांची नोंद करण्यात आली आहे. इंडियन पाम फ्लाय व रेड आय अशी या दोन प्रजातींची नावे आहेत. पश्‍चिम घाटातील पाम झाडांवर मुख्यत्वे पाम फ्लाय या फुलपाखराचा अधिवास राहतो. 

नागपुरातील डॉ. आशिष टिपले जून २००५-०६ पासून फुलपाखरू संशोधनावर काम करीत आहेत. २००९ पर्यंत त्यांनी १४५ प्रजातींची अधिकृत यादी तयार केली. त्यानंतर २०२० मध्ये त्यात चार प्रजातींची नव्याने भर पडली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात पाम फ्लाय व रेड आय या दोन प्रजातींची फुलपाखरू आढळून आली आहेत. यातील पाम फ्लाय या फुलपाखराचा अधिवास महाराष्ट्राच्या पश्‍चिम घाटातील आहे. सौंदर्यीकरणासाठी या झाडांची आयात करण्यात आली. अशाप्रकारे पाम झाडांची संख्या वाढीस लागली आणि या झाडांसोबतच फुलपाखरांच्या लार्व्हा देखील स्थलांतरित झाल्या. अनुकूल वातावरणामुळे त्यांची वाढ झाली. यापूर्वी चंद्रपूर, ताडोबा व पेंचच्या परिसरात पाम फ्लाय आढळून आले आहेत. 

फुलपाखरे हे वातावरणाचे सूचक आहेत. एखाद्या अधिवासात आपण गेलो तर त्या ठिकाणी आपणास फुलपाखरू दिसले. त्यावरुन त्या भागातील वातावरण प्रदूषित आहे किंवा नाही हे निश्‍चित करता येते. प्रदूषित असेल तर २० आणि कमी प्रदूषित असेल, तर त्यापेक्षा अधिक फुलपाखरांच्या जाती दिसतात. पॉलीनेशन (परागीकरण) क्रियेतही यांची मोठी भूमिका आहे. त्यामुळे अन्नसाखळीतील फुलपाखरांचे देखील योगदान मोठे आहे. १०० पैकी दोन ते तीन प्रजातींमधील फुलपाखरांपासून नुकसान संभावते. लाइम बटरफ्लाय, ब्ल्यू मोरमॉन, कॉमन मोरमॉन हे त्यातील काही. यांच्यापासून फक्‍त लिंबूवर्गीय पिकांना धोका राहतो. ग्रीन सिटी म्हणून नागपूरमध्ये सध्या फुलपाखरांची संख्या टिकून आहे. वृक्षतोड झाल्यास ती कमी होईल.  प्रतिक्रिया २० वर्षांपासून मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भ या भागांत फुलपाखरांवर अभ्यास सुरू आहे. पहिल्यांदाच नागपुरात रेड आय आणि पाम फ्लाय या प्रजाती दिसून आल्या आहेत. फुलपाखरांचा अधिवास असेल तर भाग वातावरणीयदृष्ट्या पोषक ठरतो.  - डॉ. आशिष टिपले, फुलपाखरू अभ्यासक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT