Two banks moved to take control of 'Mangaanga' in Sangli
Two banks moved to take control of 'Mangaanga' in Sangli 
मुख्य बातम्या

सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या कारवाईसाठी दोन बॅंकां सरसावल्या

टीम अॅग्रोवन

सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर कारखान्याकडील १०६ कोटी रुपयांच्या थकीत कर्जप्रकरणी जिल्हा बॅंकेने ऑक्‍टोबर २०१९ मध्ये नोटीस देऊन ताबा घेतला. त्यानंतर बॅंक ऑफ इंडियाने ६५ कोटी ७२ लाख रुपये थकबाकीसाठी ताबा नोटीस दिली आहे. एकाच कारखान्यावर ताबा घेण्यासाठी दोन बॅंकांनी कारवाई केली आहे.  

माणगंगा कारखान्याचा गळीत हंगाम यंदा सुरू नाही. कारखाना अडचणीत आहे. कर्जाचा डोंगर वाढत आहे. १०६ कोटी रुपयांच्या कर्जवसुलीसाठी जिल्हा बॅंकेने ताबा नोटीस बजावली होती. मात्र वसुली झाली नाही. त्यामुळे प्रतीकात्मक ताबा घेतला. त्यानंतर ऑक्‍टोबर २०१९ मध्ये बॅंक प्रशासनाने नोटीस देऊन कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा घेतला आहे. 

जिल्हा बॅंकेच्या कारवाईनंतर नुकताच बॅंक ऑफ इंडियाने ६५ कोटी ७२ लाख रुपयांच्या कर्जवसुलीसाठी एनपीए झालेल्या तारखेपासून मुद्दल आणि व्याजाच्या रकमेसाठी नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसात कर्ज भरावे, अन्यथा स्थावर मालमत्तेचा ताबा घेतला जाईल, असे नोटिशीत म्हटले आहे. दोन्ही बॅंका यापुढे कोणती कारवाई करणार याकडे सहकार आणि बॅंकिंग क्षेत्राचे लक्ष आहे. 

जिल्हा बॅंकेचाच हक्क  

माणगंगा कारखान्याला थकबाकीपोटी सर्वप्रथम जिल्हा बॅंकेने नोटीस बजावली होती. प्रथम ताबा घेतला असल्यामुळे कब्जावर पहिला हक्क जिल्हा बॅंकेचाच राहील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू- पाटील यांनी सांगितले. 

थकबाकी ४०० कोटींची 

जिल्ह्यातील साखर कारखाने व सहकारी सूतगिरण्यांकडे जवळपास ४०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. कृषी कर्जाबरोबर बिगरशेती कर्ज वसुलीचा मोठा प्रश्‍न बॅंकेसमोर उभा राहिला आहे. बॅंकेने वसुलीसाठी कठोर पावले उचलल्यामुळे बड्या थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT