यवतमाळ जिल्ह्यात आठ केंद्रांवर तूर खरेदीचे आदेश
यवतमाळ जिल्ह्यात आठ केंद्रांवर तूर खरेदीचे आदेश 
मुख्य बातम्या

यवतमाळ जिल्ह्यात आठ केंद्रांवर तूर खरेदीचे आदेश

टीम अॅग्रोवन

यवतमाळ  ः जिल्ह्यात साठवणुकीच्या समस्येमुळे तूर खरेदी अडचणीत सापडली होती. जिल्हा प्रशासनाने हा तिढा काही अंशी सोडवीत जिल्ह्यात आठ केंद्रांवर तूर खरेदीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. जिल्ह्यात शासकीय तसेच एफसीआयच्या गोदामाचा अभाव आहे. काही ठिकाणी असलेल्या गोदामातदेखील यापूर्वीच्या हमीभावाने खरेदी केलेला शेतीमाल साठविण्यात आला आहे. त्यामुळे गोदामाची समस्या निर्माण झाल्याने नोंदणीनंतरही तूर खरेदीचा तिढा सुटू शकला नव्हता. जिल्हाधिकारी एम. देवेंद्रसिंह यांनी जिल्ह्यात खासगी गोदामात तूर साठवणुकीला मान्यता मिळावी, याकरिता नाफेडकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर आता जिल्ह्यात तब्बल आठ ठिकाणी तूर खरेदी केली जाणार आहे. तसे मॅसेजदेखील शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाठविण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  पांढरकवडा, बाभूळगाव, मारेगाव, पुसद, नेर, दारव्हा, महागाव आणि आर्णी या केंद्रांवर तूर खरेदी सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा माल लवकरात लवकर उचल करून त्यांना हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. तुरीला ५८०० रुपयांचा हमीभाव असून, बाजारात सध्या त्यापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी करीत व्यापाऱ्यांकडून लुटीचे प्रकार घडत आहेत. नाफेडच्या बाजारातील हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना चांगले दर मिळणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT