तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढीचा अादेश निघाला
तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढीचा अादेश निघाला 
मुख्य बातम्या

तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढीचा अादेश अखेर निघाला

टीम अॅग्रोवन

नागपूर : यापूर्वी निर्धारित केलेले अटी व नियम कायम ठेवत केंद्रीय कृषी मंत्रालयाने नाफेडअंतर्गत तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. २३ एप्रिल रोजी या संदर्भातील आदेश काढण्यात आले.  बाजारात तुरीचे दर घसरल्याने शासनाने नाफेडअंतर्गत तुरीच्या खरेदीस मंजुरी दिली. एफएक्‍यू दर्जाच्या तुरीची ५०४० या हमीभावाने खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले. राज्यभरात लाखो शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. खरेदी केंद्रावर गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे कळविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. एसएमएस गेल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी केंद्रावर न्यावा, असे अपेक्षित आहे. त्यानुसार राज्यात खरेदीला सुरवात झाली; परंतु काही केंद्रावर बारदाना तर काही केंद्रावर साठवणुकीची व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांच्या मालाची खरेदीच झाली नाही. त्यात १८ एप्रिलपर्यंतच खरेदीची मुदत असल्याने हजारावर शेतकऱ्यांच्या मालाची विक्रीच होऊ शकली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्‍त होत होता. शेतकऱ्यांमधील हा असंतोष लक्षात घेत राज्य शासनाकडून तूर खरेदीची मुदत वाढविण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली. ९ एप्रिल रोजी त्या संदर्भातील पत्र पाठविण्यात आले होते. राज्य सरकारच्या मागणीची दखल घेत केंद्रीय कृषी मंत्रालयाने १५ मेपर्यंत तूर खरेदीस मुदतवाढ दिली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT