तूर काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. गेल्या वर्षी केवळ सांगली येथील बाजार समितीत तूर खरेदी केंद्र सुरू केले होते. जिल्ह्यातील आटपाडी, जत, हे दोन तालुके सुमारे सांगलीपासून १०० किलोमीटर अंतरावर आहेत. यामुळे गेल्या वर्षी या भागातील शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी सांगली येथे येणे परवडत नव्हते.
परिणामी, शेतकऱ्यांना कमी दरात तुरीची विक्री करावी लागली होती. यंदाचा हंगाम सुरू झाला आहे. शासन या वेळी तूर खरेदी केंद्र सुरू करणार का? जत व आटपाडी तालुक्यांतील बाजार समितीत तूरखरेदी केंद्र सुरू होणार का, असा प्रश्न तूर उत्पादक शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.
जत तालुक्यात पेरणीपासून पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. यामुळे तूर पिकाची अपेक्षित वाढ झाली नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पाणीटंचाई असल्याने काही शेतकऱ्यांनी तूर पिकावर नांगरदेखील फिरवले होते. मात्र या तालुक्यात सुमारे तुरीचे ३० टक्क्यांनी उत्पादन घटण्याची शक्यता आहे. वास्तविक पाहता एकरी उत्पादनही मोठी घट होणार असल्याची माहिती श्रीकृष्ण शिंदे यांनी दिली.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.