मुख्य बातम्या

दुष्काळी परिस्थितीने फळबाग लागवड योजना अडचणीत

टीम अॅग्रोवन

अकोला : कमी पावसामुळे राज्यात विविध भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली अाहे. त्यामुळे या हंगामापासून राबविण्यात येत असलेली भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अडचणीत सापडण्याची शक्यता अाहे. काही दिवसांपासून पूर्वसंमती पत्रवाटप सुरू करण्यात अाले. मात्र रोपे जगविण्याविषयी शंका शेतकरी उपस्थित करू लागले अाहेत.   

शासनाने सन २०१८-१९ पासून ही योजना नव्याने सुरू केली. योजनेमध्ये केंद्र शासनाच्या महात्मा गांधी, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत लाभ घेऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी शासनाच्या कृषी खात्यावर देण्यात अाली अाहे. योजनेत आंबा, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, नारळ, सीताफळ, चिंच, जांभूळ, फणस, कोकम, अंजीर, अावळा, चिकू अादी फळपिकांचा समावेश अाहे. झाडे लागवडीसाठी खड्डे खोदणे, रोपांची लागवड, पीकसंरक्षण, ठिबक सिंचन बसविणे, नांग्या भरणे अादींसाठी अनुदान दिले जाईल.    

राज्यात ठिकठिकाणी कृषी विभाग शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी पूर्वसंमती देत अाहे. ही प्रक्रिया अाधीपासून करणे अपेक्षित असताना त्यासाठी मागील महिन्यापासून वेग देण्यात अाला.

योजनेत निवड झालेल्या शेतकऱ्यांना मंजूर अनुदान पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० आणि तिसऱ्या वर्षी २० टक्के असे मिळेल. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील अनुदान झाडे जगविण्यावर अवलंबून अाहे. भूजल पातळीत कमालीची घट अाहे. लागवड केलेल्या शेतकऱ्यांना बागायती झाडे ९० टक्के, तर कोरडवाहू झाडे ८० टक्के जिवंत ठेवणे आवश्यक आहे. या हंगामात कुठल्याच जिल्ह्यात पीकपरिस्थिती चांगली नाही. परतीच्या पावसाअभावी हंगाम अडचणीत आहे. विहिरींची पाणीपातळी घटल्याने सिंचनावर परिणाम झालेला अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT