ऊस बियाण्याबाबत माहिती देताना कृषी अधिकारी 
मुख्य बातम्या

बेलवडे हवेली येथे एकरी १५० टन ऊस उत्पादनासाठी शेतीशाळा

टीम अॅग्रोवन

कऱ्हाड, जि. सातारा  ः कृषी विभागामार्फत पिकांवरील कीड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पअंतर्गत ऊस पिकाचे एकरी १५० टन उत्पादन घेण्यासाठी बेलवडे हवेली (ता. कऱ्हाड) येथे दहा आठवड्यांची आडसाली ऊस उत्पादक शेतकऱ्यांची शेतीशाळा हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. 

गावातील ऊस उत्पादकांनी सामाजिक व समान गरजेतून एकत्र येऊन प्रत्यक्ष अनुभवावर आधारीत व संशोधनात्मक पद्धतीचा अवलंब करून क्षेत्रीय प्रात्यक्षिकांच्या अभ्यासक्रमांद्वारे ऊस पीक व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान शेतीशाळेच्या उपक्रमांतून राबविण्यात येत आहे. शेतीशाळेसाठी गावातील ३० शेतकऱ्यांची निवड ग्रामसभा व शेतकऱ्यांशी चर्चा करून करण्यात आली. या शेतीशाळेच्या माध्यमातून निवडलेल्या शेतकऱ्यांना ऊसामधील तज्ज्ञ शेतकरी बनविण्यात येणार आहे.

हे तज्ज्ञ शेतकरी पुढील कालावधीमध्ये बेलवडे हवेली व परिसरामध्ये ऊस पिकामधील तज्ज्ञ शेतकरी म्हणून काम करणार आहेत. शेतीशाळेमध्ये निवडलेल्या ३० ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी १५० टन उत्पादनाचे तंत्रज्ञानाअंतर्गत जमिनीची निवड, माती परीक्षण, सरीचे अंतर, ऊस लागवडीचे अंतर, एक डोळा, दोन डोळा व रोपे लागवड पद्धत, माती परीक्षणानुसार एकात्मिक खत व्यवस्थापन, हिरवळीच्या खतांचा वापर, पीक वाढीसाठी सूक्ष्म मूलद्रव्यांचा वापर, एकात्मिक कीड व पाणी व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान याची माहिती देण्यात येत आहे.

शेतीशाळेचा कार्यक्रम उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, मंडळ कृषी अधिकारी पी. ए. जाधव, कृषी कृर्यवेक्षक सुनील ताकटे, कृषी सहायक अशोकराव कोळेकर यांच्यासह कऱ्हाड मंडलातील कृषी सहायकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Second List: कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Agriculture Graduates Issues: कृषी पदवीधर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कृषिमंत्र्यांची भेट

Silk Farming: रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची संधी : डॉ. महेंद्र ढवळे

Shetkari Samruddhi Kisan Rail: ‘शेतकरी समृद्धी’ किसान रेल नावालाच!

Sugarcane Price Protest: ऊस दर जाहीर न करताच जॅगरी प्रकल्प सुरू, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT