Tour waiting for guaranteed purchase in Aurangabad
Tour waiting for guaranteed purchase in Aurangabad 
मुख्य बातम्या

हमीभावातील तूर खरेदी प्रतीक्षेतच

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : जिल्ह्यात ऑनलाइन पीकपेरा मिळण्यासाठीची गती अतिशय संथ आहे. हमीभावाने तूर खरेदीसाठीही अजून प्रतीक्षा आहे. अशातच जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत आधी पाच केंद्रांना मंजुरी मिळाली. आता सोयगाव येथे मंजूर केलेल्या सहाव्या केंद्राची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण मंजुरी मिळालेल्या हमी दर खरेदी केंद्राची संख्या आठवर पोहोचली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनतंर्गत गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड व औरंगाबाद या पाच केंद्राचा समावेश होता. शिवाय करमाड व सोयगाव येथील केंद्राचा प्रस्ताव मंजूरातीच्या प्रतीक्षेत होता. मंगळवारी (ता.११) सोयगाव येथील केंद्राला मंजुरी देण्यात आली. विदर्भ मार्केटिंग फेडरेशनतंर्गत पैठण व लासूर येथील केंद्रांना हमीभावाने तूर खरेदीसाठी मंजुरी देण्यात आली  होती. 

यंदा हमीभावाने तूर खरेदीसाठी ऑनलाइन सातबाऱ्यावर ऑनलाइन पिकपेरा नसणे ही मोठी अडचण ठरली आहे. अनेक केंद्रांतर्गत शेतकऱ्यांना ऑनलाइन सातबारावर आवश्‍यक ऑनलाइन तुरीचा पिकपेरा मिळण्याचे कोड अजूनही सुटलेले नाही. शिवाय पीकपेरा मिळत असलेल्या ठिकाणी असा पिकपेरा मिळण्याची गती अत्यंत संथ असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने तूर विकण्याची वेळ येत आहे. हमी दराने तूर खरेदी सुरू होण्याला होत असलेला विलंब शेतकऱ्यांच्या दृष्टीने नुकसानकारक ठरला आहे.

नोंदणीसाठी मिळतोय प्रतिसाद 

मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत गंगापूर, खुलताबाद व औरंगाबाद या केंद्रांवर तूर खरेदीसाठी प्रतिसाद मिळत आहे. गंगापूरच्या केंद्रावर ३७७, खुलताबाद येथे २१, तर औरंगाबाद येथील केंद्रावर ९३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. वैजापूर व कन्नड येथील नोंदणी झाली नाही. विदर्भ मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत पैठणच्या केंद्रावर ७४५, तर लासूर स्टेशन येथील केंद्रावर २२६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

SCROLL FOR NEXT