राज्यात विजा, मेघगर्जनांसह पावसाची शक्यता
राज्यात विजा, मेघगर्जनांसह पावसाची शक्यता 
मुख्य बातम्या

राज्यात विजा, मेघगर्जनांसह पावसाची शक्यता

वृत्तसेवा

पुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने आजपासून (ता. २) विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजा मेघगर्जनांसह पावसाची शक्यता आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.   बिहार आणि परिसरावर हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरापासून तमिळनाडूच्या किनाऱ्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पावसाला पोषक हवामान झाल्याने कोकणातील ठाणे आणि रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. उर्वरित राज्यात मुख्यतः कोरडे हवामान होते. बुधवारनंतरच मॉन्सूनचा परतीचा प्रवास  अरबी समुद्रातील शाहीन चक्रीवादळ निवळल्यानंतर मंगळवारपासून (ता. ५) देशाच्या वायव्य भागात वाऱ्याची दिशा बदलणार असून, आर्द्रतेती टक्केवारी चांगलीच कमी होण्याचे संकेत आहेत. या भागात मुख्यतः कोरडे हवामान होणार असल्याने बुधवारपासून (ता. ६) मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान तयार होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) कोकण : रायगड, रत्नागिरी. विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) मध्य महाराष्ट्र : नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. मराठवाडा : बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर.  विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

POCRA Subsidy : ‘पोकरा’चे अनुदान लाटण्यासाठी बोगस बिले सादर केल्याचा संशय

Tomato Cultivation : अकोले, संगमनेरमध्ये टोमॅटो लागवडीत घट

Vithhal Sugar Mill : विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई अखेर मागे

Drought Crisis : पाण्याशिवाय जगणं मुश्किल झालंय

SCROLL FOR NEXT