तीन कृषी सहसंचालकांना पदोन्नती
तीन कृषी सहसंचालकांना पदोन्नती 
मुख्य बातम्या

तीन कृषी सहसंचालकांना पदोन्नती

टीम अॅग्रोवन

पुणे : कृषी खात्याच्या तीन सहसंचालकांना संचालकपदी पदोन्नती देण्याचा आदेश अखेर मंत्रालयातून गुरुवारी जारी झाला. गेल्या काही महिन्यांपासून पदोन्नतीचे आदेश रखडले होते.

अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांना कृषी आयुक्तालयात कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाच्या संचालकपदी पदोन्नती मिळाली आहे. पुण्याचे विभागीय कृषी सहसंचालक दिलीप झेंडे यांना निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालकपद मिळाले आहे. त्यांच्याकडे सध्या या पदाची तात्पुरती सूत्रे होती.

ठाण्याचे विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील यांना विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालकपद मिळाले आहे. दरम्यान, मृद्संधारण संचालक डॉ.कैलास मोते यांची फलोत्पादन संचालकपदी बदली करण्यात आली आहे.

“राज्य सरकारने पदोन्नतीच्या रूपाने कृषी विभागाला एक प्रकारे दिवाळी भेट दिली आहे. आयुक्तालयात अनेक महिन्यांपासून संचालकपदे रिक्त होती. ही पदे भरली गेल्याने आता कामकाजाला गती मिळेल,” अशी प्रतिक्रिया एका सहसंचालकाने व्यक्त केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT