There is no danger of ‘Shaheen’
There is no danger of ‘Shaheen’ 
मुख्य बातम्या

महाराष्ट्राला ‘शाहीन’चा धोका नाही

टीम अॅग्रोवन

पुणे : अरबी समुद्रात तीव्र कमी दाब क्षेत्राची (डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. आज (ता. १) पाकिस्तानच्या किनाऱ्यालगत चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली भारताच्या किनाऱ्यापासून दूर पाकिस्तान, मकरान किनाऱ्याकडे जाणार आहे. परिणामी या चक्रीवादळाचा महाराष्ट्राला कोणताही धोका नाही.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले गुलाब चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्यावर धडकले. त्यानंतर ही वादळी प्रणाली आंध्र प्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्राच्या मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातून गुजरातकडे निघून गेली. गुरुवारी (ता. ३०) सकाळी अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र देवभूमी द्वारिकेच्या पश्‍चिमेकडे ६० किलोमीटर तर पाकिस्तानच्या कराचीपासून ८६० किलोमीटर आग्नेयेकडे अरबी समुद्रात होते. आज (ता. १) अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे संकेत आहेत. 

अरबी समुद्रातील प्रणालीमुळे पश्‍चिमेकडे सरकून जाणार असली तरी गुजरातच्या किनाऱ्यालगत दोन दिवस उंच लाटा उसळण्याची तसेच ताशी ४० ते ८० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर मात्र या प्रणालीचा फारसा प्रभाव जाणवणार नाही.

...त्यानंतरच मॉन्सूनचा परतीचा प्रवास शक्य अरबी समुद्रातील वादळी प्रणाली भारताच्या किनाऱ्यापासून दूर गेल्यानंतर ५ ऑक्टोबरपासून देशाच्या वायव्य भागात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने सभोवताली बाहेरच्या बाजूला वारे वाहणारी स्थिती असणारी क्षेत्रे (ॲण्टी सायक्लोन) तयार होणार आहेत. या परिसरात वाऱ्याची दिशा बदलणार असून, आर्द्रतेची टक्केवारी चांगलीच कमी होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे ६ ऑक्टोबरपासून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान तयार होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : धाराशिव जिल्ह्यात ५ लाख हेक्टरवर पेरणी प्रस्तावित

Animal Husbandry : संकटावर मात करत शोधला पशुपालनाचा मार्ग

Grain Storage : देशातील धान्य साठवणूक अन् वितरण व्यवस्था

Water shortage : जायकवाडी धरणाने वाढवली छ. संभाजी नगरकरांची चिंता; धाराशिवला टँकरचा आधार

Tomato Disease : टॉमॅटो पिकातील ‘लवकर येणारा करपा’

SCROLL FOR NEXT