सांगलीत अनुदान रक्कम येईपर्यंत दूधदरात स्पष्टता नाही
सांगलीत अनुदान रक्कम येईपर्यंत दूधदरात स्पष्टता नाही 
मुख्य बातम्या

सांगलीत अनुदान रक्कम येईपर्यंत दूधदरात स्पष्टता नाही

टीम अॅग्रोवन

सांगली ः जिल्ह्यात सहकारी आणि खासगी असे ३५ दूध संघ आहेत. त्यामध्ये गाईचं प्रति महिना १३ लाख लिटर दूध संकलन होते आहे. सध्या तरी जिल्ह्यातील कोणत्याही संघाने दूध दरात कपात केली नसल्याचे चित्र आहे. शासनाने दिलेल्या ३.५ फॅटला २५ रुपये प्रति लिटर असा दर दिला जातोय. मात्र, शासनाच्या अनुदानाची रक्कम येत नाही तोपर्यंत त्यामध्ये स्पष्टता नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्यात सुमारे गाई आणि म्हशींची ६ लाख ६७ हजार ६३५ इतकी संख्या आहे. जिल्ह्यात प्रति महिना गाईचे दूध सरासरी १३ लाख लिटर संकलन होते आहे. शासनाने दुधाला पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, सध्या गाईच्या अनुदानाची रक्कम अद्यापही वर्ग झाली नाही. असे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अनेक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. परंतु अनेक दूध संस्थांकडून अनुदानाबाबतची स्पष्टता केलेली नाही.

जिल्ह्यातील सर्व संघ शासन निर्णयाचे पालन करताना दिसताहेत. गाईच्या दूधाचे दर हे पावडरवर अवलंबून आहेत. मात्र, सध्या पावडीचे दर कमी आहेत. त्यामुळे दुधाला २५ रुपये दर देणे परवडत नाही. त्यामुळे शासनाने पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले. शासनाने दुधाचे पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे संघाने हे अनुदान अगोदरच शेतकऱ्यांना दिले आहे. हे अनुदान देताना संघाना तारेवरची करसत करावी लागते आहे.

माझ्याकडे २५ गाई आहेत. दररोज सुमारे १७५ ते १८० लिटर दुधाची विक्री होते. दूध खरेदीमध्ये कपात केली जात नाही. त्यामुळे शासनाच्या निर्णयाप्रमाणे दर मिळतोय. - बाहुबली महावीर अवधूत, डिग्रज, ता. मिरज, जि. सांगली.

शासनाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना दर देतोय. शासनाने पाच रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, हे अनुदान अद्यापही आलेले नाही. हे अनुदान आले नाही, तर भविष्यात जिल्ह्यातील संघ तोट्यात येण्याची शक्‍यता आहे. - अमरसिंह देशमुख, अध्यक्ष, बाबासाहेब देशमुख दूध संघ आटपाडी, जि. सांगली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT