खरेदी केंद्रांकडे कापूस उत्पादकांची पाठ
खरेदी केंद्रांकडे कापूस उत्पादकांची पाठ 
मुख्य बातम्या

खरेदी केंद्रांकडे कापूस उत्पादकांची पाठ

टीम अॅग्रोवन

जळगाव : खानदेशात भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआय) फक्त चार खरेदी केंद्र सुरू असून, त्यात सुमारे तीन हजार क्विंटल कापसाची खरेदी झाली. कापसाचे बाजारातील दर हमीभावापेक्षा अधिक असल्याने शासकीय खरेदीस या आठवड्यातही प्रतिसाद मिळाला नाही. पणन महासंघाने सीसीआयचे सबएजंट म्हणून खरेदीसंबंधी सुरू केलेल्या केंद्रांमध्येही कापसाची आवक झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

पणन महासंघाने अमळनेर, धरणगाव, पारोळा, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, रावेर, धुळे, नाशिक जिल्ह्यांतील येवला व मालेगाव येथे खरेदी केंद्र सुरू करण्याची कार्यवाही केली. केंद्राचे उद्‌घाटन करण्याची तयारी झाली. परंतु खरेदी सुरू झाली नाही. बाजारात कापसाचे दर हमीभावापेक्षा अधिक असल्याने खरेदीचा मुद्दाच महासंघासमोर राहिला नाही. सीसीआयने जळगाव जिल्ह्यात शेंदूर्णी, जामनेर, चाळीसगाव, एरंडोल, बोदवड, भुसावळ, जळगाव आणि नंदुरबार व शहादा (जि. नंदुरबार) येथे खरेदी केंद्रांची तयारी केली. यातील जळगाव, एरंडोल, शहादा, नंदुरबार येथेच खरेदी सुरू झाली. उर्वरित केंद्र सुरू झाली नसल्याची माहिती मिळाली. 

सीसीआयने सुमारे तीन हजार क्विंटल कापसाची खरेदी केल्याचे सांगण्यात आले. सर्वाधिक सुमारे ८०० क्विंटल कापूस खरेदी जळगाव येथील केंद्रात झाली. भुसावळ व जामनेर येथेही केंद्र सुरू झाले. परंतु तेथे आवक नाही. एरंडोलातही मागील महिन्यात आवक झाली. नंतर आवक झाली नसल्याचे सांगण्यात आले.

शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले, तेव्हापासून व्यापारी, खरेदीदारांनी कापसाची खेडा खरेदी केली. त्या वेळी किमान ५५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर द्यायला सुरवात केली. हमीभावापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकरी गावातच कापसाची विक्री व्यापाऱ्यांना करीत आहेत. परिणामी शासकीय केंद्रात कापसाची आवक होत नसल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT