Tax on paddy crop in Ajra taluka
Tax on paddy crop in Ajra taluka 
मुख्य बातम्या

आजरा तालुक्यात भात पिकावर करपा

टीम अॅग्रोवन

आजरा, जि. कोल्हापूर : आजरा तालुक्‍यात भातावर करपा व कडा करप्याचा प्रादुर्भाव झाला आहे. सुमारे ३०० हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले आहे. वातावरणातील बदलाच्या परिणामामुळे रोग पडल्याचे सांगितले जात असून त्याला वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार फवारणी करावी, अशा सूचना कृषी विभागाकडून करण्यात आल्या आहेत.

आठ दिवसांपूर्वी तालुक्‍यात ढगाळ वातावरण तयार झाले होते. सलग चार दिवस तालुक्‍यात अतिवृष्टी झाली. सध्या पावसाची उघडीप असून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे हे वातावरण रोग व किडीला पोषक आहे. त्यामुळे भात व ऊस पिकावर रोगांचे प्रमाण वाढले आहे.

भाताच्या पानावर छोटे-छोटे ठिपके दिसत असून काही ठिकाणी पाने पिवळसर होऊन कडा वाळल्याचे दिसते. त्यामुळे या पिकावर करपा व कडा करपा हे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्‍यातील सर्वच गावात याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्याचे ढगाळ व कुंद वातावरण पाहता हा रोग अधिक प्रमाणात पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे या रोगाला वेळीच नियंत्रण आणण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना फवारणीच्या सूचना केल्या आहेत.

काही ठिकाणी शेतकऱ्यांनी नत्र खताचा अतिरिक्त वापर केल्यामुळे भात पिकावर या रोगाचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आवश्‍यक त्या प्रमाणे नत्र खतांचा वापर करावा, अशीही सूचना कृषी विभागाने केली आहे. पुराचा फटका नदीकाठच्या पिकांना बसला आहे. त्यातच रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. माळरान, नदीकाठ, पाणथळ परिसरात सर्वत्र या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे सांगण्यात येते.

वेळीच फवारणी करावी वातावरणीय बदलामुळे भात व ऊस पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. भातावर करपा व कडा करपा, तर उसावर तांबेरा पडला आहे. शेतकऱ्यांनी वेळीच फवारणी करावी. रोगावर नियंत्रण करणे शक्‍य होईल, अशी माहिती कृषी अधिकारी सुधीर खोराटे आणि कृषी पर्यवेक्षक विजयसिंह दळवी यांनी दिली.

दृष्टिक्षेप

  • भाताचे क्षेत्र ९ हजार ७०० हेक्‍टर
  • ढगाळ व कुंद वातावरणाचा परिणाम
  • उत्पादनात घट होण्याची भीती
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agriculture Irrigation : 'शिरसाई'चे दहा दिवसांचे उन्हाळी आवर्तन

    Cotton Bales Production : खानदेशात यंदा २५ टक्के कापूसगाठी निर्मितीत घट

    Paddy Procurement : भरडाई रखडल्याने २१ लाख क्‍विंटल धान गोदामातच

    Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

    Banana Market : रावेरातून केळीची रेल्वेने वाहतूक सुरू

    SCROLL FOR NEXT