अकोला ः बोर्डी गावातील विशाल भालतिलक यांच्या शेतात टँकरने पाणी आणून संत्रा झाडांना दिले जात आहे.
अकोला ः बोर्डी गावातील विशाल भालतिलक यांच्या शेतात टँकरने पाणी आणून संत्रा झाडांना दिले जात आहे. 
मुख्य बातम्या

दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या पाण्याचा आधार

टीम अॅग्रोवन

अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर वेढले आहे. शेतांमध्ये उभ्या असलेल्या फळबागांसाठी उगवणारा दिवस अडचणीचा ठरू लागला असून, आता अनेक शेतकऱ्यांना पाण्याअभावी या बागा कशा जगवाव्यात, असा पेच पडला आहे. काही शेतकरी मिळेल त्या साधनांचा व पर्यायाचा विचार करून बागा जगविण्याची धडपड करू लागले आहेत. सातपुड्याच्या पायथ्याशी संत्र्यासारखे प्रमुख पीक असून, ते जगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे. अकोट तालुक्यातील अनेकांनी फळबागा तोडण्याचे काम हातात घेतले. काही शेतकऱ्यांनी फळबागा वाचविण्यासाठी खर्च करण्याची मानसिकता केली आहे. बोर्डी गावातील विशाल भालतिलक या युवा शेतकऱ्याकडे आठ एकरांत फळबाग आहे. त्यात चार एकर डाळिंब व चार एकरांत संत्रा आहे. आतापर्यंत बोअरवेलचे पाणी बागेसाठी पुरेशे होते. मात्र, सद्यःस्थितीत हे पाणी अपुरे ठरल्याने बागेसाठी पाचशे रुपये रोजाने टँकर भाड्याने आणले. स्वतःच्या ट्रॅक्टरला टँकर लावून दुसऱ्या शेतकऱ्याकडून पाणी आणून तीन मजुरांच्या साह्याने बागेला पाणी देत आहे. फळबागेचा विमा काढलेला आहे. अद्याप कुठलीही मदत त्याद्वारे झालेली नाही. पाणीच शिल्लक न राहल्याने दोन एकरांतील संत्रा बाग तशीच सोडून दिली असून, दोन एकरांतील झाडे वाचविण्याचे प्रयत्न करीत असल्याचे विशाल भालतिलक यांनी सांगितले.   शासकीय मदतीची आस अकोट तालुक्यात दुष्काळ जाहीर होऊन आता चार महिने लोटली. मात्र, या काळात दुष्काळी मदत कुठलीही हातात पडली नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. विशाल भालतिलक यांच्या कुटुंबाला एकही रुपयाची दुष्काळी मदत झालेली नाही. सोबतच नुकसान होत असताना कुठला शासकीय अधिकारीही बांधापर्यंत पोचलेला नसल्याची खंत विशाल याने बोलून दाखवली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT