खानदेशात टॅंकर सुरूच; पण संख्येत घट
खानदेशात टॅंकर सुरूच; पण संख्येत घट 
मुख्य बातम्या

खानदेशात टॅंकर सुरूच; पण संख्येत घट

टीम अॅग्रोवन

जळगाव ः खानदेशात टॅंकर सुरूच आहेत; परंतु टॅंकरच्या संख्येत घट झाली आहे. धुळे जिल्ह्यात सुमारे १९, तर जळगाव जिल्ह्यात आठवडाभरात टॅंकरमध्ये २४ ने घट झाली आहे. सध्या ८२ गावांना ७५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. यात खासगी टॅंकर ६८, तर शासकीय टॅंकर ७ सुरू आहेत.  धुळे जिल्ह्यात २० जुलैपर्यंत ७३ टॅंकर सुरू होते. त्यात सुमारे १० ने घट झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातही सुमारे ६४ टॅंकर सुरू होते. त्यातही घट झाली असून, तेथे ६० टॅंकर सुरू असल्याची माहिती मिळाली. मंगळवारी २३ जुलैला १२६ गावांमध्ये १०४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. आता ती संख्या ७५ वर आली आहे.  पाच दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू असल्याने विहिरी, कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे पाण्याचे टॅंकर कमी झाल्याचे सांगण्यात आले. टॅंकरची संख्या आणखी कमी होऊ शकते. त्यासंबंधी तहसीलदार कार्यालय व संबंधित यंत्रणेने आढावा घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडे अहवाल प्राप्त होईल. आढावा घेतल्यानंतर टॅंकरची संख्या कमी करण्यासंबंधी निर्णय जाहीर होईल. पाऊस सुरू असला तरी धुळे, नंदुरबारमधील शहादा भागात जोरदार पाऊस नसल्याने जलपातळी फारशी वाढलेली नाही. धुळ्यातील बुराई, अमरावती प्रकल्पांमध्ये फारसा साठा नाही.  जळगाव जिल्ह्यातील पश्‍चिम भागातील बोरी, भोकरबारी, अंजनी, बहुळा, मन्याड, हिवरा, अग्नावती हे प्रकल्पही कोरडे आहेत. याच भागात टॅंकरही सुरू आहेत. बोदवड, अमळनेर, पारोळा, भडगाव या भागात टॅंकर सुरू असल्याची माहिती मिळाली. तर नंदुरबारमध्ये नंदुरबार, धुळ्यात साक्री, शिंदखेडा भागात टॅंकर अधिक आहेत, असे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT