Take advantage of Fruit Crop Insurance Scheme: Mastoli
Take advantage of Fruit Crop Insurance Scheme: Mastoli 
मुख्य बातम्या

फळपीक विमा योजनेचा लाभ घ्या : मास्तोळी

टीम अॅग्रोवन

सांगली : ‘‘बिगर कर्जदार, कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत पेरु व लिंबू पिकांसाठी २४ जून आणि डाळिंब पिकासाठी १४ जूलै आहे. उत्पादक शेतकऱ्यांनी विहीत मुदतीत विमा हप्ता भरुन या योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा’’, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले. 

मास्तोळी म्हणाले, ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेंतंर्गत जिल्ह्यात पूनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना (मगृ बहार) सन २०२०-२१ मध्ये डाळिंब, पेरू व लिंबू या फळपिकांसाठी अधिसूचित महसूल मंडळांना लागू करण्यास निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विम्याचा लाभ घ्यावा.’’ 

‘‘कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा सहभाग ऐच्छिक आहे. अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी, एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा अंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल. केवळ उत्पादकक्षम फळबागांनाच विमा संरक्षण लागू आहे. जिल्ह्यात ही योजना भारतीय कृषि विमा कंपनी लिमिडेट (मुंबई) मार्फत राबविण्यात येत आहे. डाळिंब, पेरू आणि लिंबू उत्पादक शेतकऱ्यांनी वेळेत या योजनेसाठी विमा हप्ता भरुन पिकांचे संरक्षण घ्यावे, असे आवाहन मास्तोळी यांनी केले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain : पूर्व विदर्भाला वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका

Weather Update : विदर्भात गारपीट, वादळी पावसाचा इशारा

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

SCROLL FOR NEXT