ताकारी सिंचन योजना सुरू Takari irrigation scheme started
ताकारी सिंचन योजना सुरू Takari irrigation scheme started 
मुख्य बातम्या

ताकारी सिंचन योजना सुरू

टीम अॅग्रोवन

सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेचे रब्बीचे आवर्तन सुरू होऊन वीस दिवस झाले असून, योजना पूर्ण क्षमतेने सुरू आहे. या योजनेच्या लाभ क्षेत्राच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी देण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. सध्या १४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. रब्बीचे आवर्तन सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ताकारी प्रकल्पात वाळवा, कडेगाव, खानापूर, पलूस, तासगाव आणि मिरज, अशा सहा तालुक्यांचा समावेश असून, २७ हजार ४३० हेक्टर क्षेत्र आहे. या योजनेतून ९.३४ टीएमसी पाणी उचलण्याची परवानगी आहे. यंदा जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध झाले होते. परंतु पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात झाला होता. नोव्हेंबर शेवटच्या आठवड्यात ताकारी उपसा सिंचन योजना सुरू करण्याची मागणी सुरू झाली होती. परंतु या मागणीकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केले होते. त्यानंतर डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात योजना सुरू करण्यात आली. सुरुवातीला पाच पंप सुरू करण्यात आले होते. त्यानंतर टप्प्या टप्प्याने पंपाची संख्या वाढविण्यात आली. दरम्यान, गतवर्षी ताकारीचे पहिले आवर्तन डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू करण्यात आले होते. कोयना धरणाच्या प्रकल्पातून ९.४३ पाणी उचलण्याची परवानगी आहे. गेल्यावर्षी योजनेचे दोन आवर्तनासाठी ३.१० टीएमसी पाणी उचलले होते. तर तिसऱ्या आवर्तनासाठी २.४० टीएमसी पाण्याचा वापर झाला होता. म्हणजे गेल्यावर्षी ताकारी योजनेतून ५.५० टीएमसी इतके पाणी उचलण्यात आले होते. त्यामुळे पाणी कमी लागल्याने ३.३८ टीएमसी पाण्याचा उपसा कमी झाला होता. यंदाच्या वर्षी हेच आवर्तन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात आले आहे. वास्तविक पाहता, पंधरा ते वीस दिवस अगोदर रब्बीसाठीचे हे आवर्तन सुरू झाले आहे. यंदा देखील ताकारी योजनेसाठी पाणी कमी लागेल, अशी शक्यता पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे.  

मंजूर कामांसाठी निधीची गरज ताकारी उपसा सिंचन योजनेचे लाभ क्षेत्र २७ हजार हेक्टर इतके असून, सध्या १४ हजार हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे. उर्वरित क्षेत्र सिंचनाखाली येण्यासाठी योजनेची कामे पूर्ण होण्याची आवश्यकता आहे. परंतु ही कामे पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता असून, मंजूर झालेला निधी संबंधित विभागाने पाटबंधारे विभागाकडे वर्ग करण्याची गरज आहे.

अशी आहे ताकारी योजना

  •  सध्या १४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली
  •  वाळवा, कडेगाव, खानापूर, पलूस, तासगाव, मिरज तालुक्यांत लाभ क्षेत्र 
  •  एकूण लाभ क्षेत्र २७ हजार ४३० हेक्टर
  •  सध्या १४ हजार हेक्टर शेती सिंचनाखाली 
  •  योजनेसाठी ९.३४ टीएमसी पाणी उचलण्याची परवानगी
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Onion Market Rate : कांदा खरेदीचा मलिदा कोण खाणार ? कांद्याचे भाव उत्पादन खर्चापेक्षाही कमीच

    Kolhapur Farmers : कोल्हापुरातील शेतकरी राष्ट्रीय महामार्ग रोखणार, भारत पाटणकर यांचा इशारा

    Crop Damage : केळी, पपईच्या नुकसानीची भरपाई द्या : शेतकऱ्यांची मागणी

    Drought Condition : माथा ते पायथा जलसंधारणातून दुष्काळाच्या झळा कमी करणे शक्य

    Manjra Dam : ‘मांजरा’तील गाळाच्या आकड्यांचा घोळ

    SCROLL FOR NEXT