sweet corn
sweet corn  
मुख्य बातम्या

चक्रीवादळाच्या तडाख्यात मधूमका भुईसपाट

टीम अॅग्रोवन

नाशिक: नाशिक, सिन्नर व इगतपुरी तालुक्यांमध्ये १ हजारहुन अधिक क्षेत्रावर उन्हाळी हंगामात मधूमक्याची लागवड केली जाते. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात निम्म्याहून अधिक क्षेत्रावरील नव्या व काढणीस आलेल्या मधुमक्याच्या लागवडी जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. दरवर्षी ग्राहकांची मधूमक्याला मोठी पसंती असल्याने नाशिक तालुक्यातील नानेगाव, लहवीत, वंजारवाडी, राहुरी, भगूर, इगतपुरी तालुक्यातील साकुर, माणगाव, नांदगाव बुद्रुक, अस्वली स्टेशन, घोटी बुद्रुक, पिंपळगाव डुकरा, पिंपळगाव घाडगाव, सिन्नर आगासखिंड, पांढुर्ली, बेलू, शेणीत, राहुरी, घोरवड, शिवडा, विंचूर दळवी, शेणीत गावांच्या परिसरात लागवडी मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र, निसर्ग चक्रीवादळाचा प्रमुख मार्ग जिल्ह्यातील सिन्नर इगतपुरी तालुक्यातील गावामधून झाल्याने हे नुकसान वाढले आहे. मका पडून त्यास माती लागल्याने त्याची प्रतवारी खराब होऊन माल सड होण्याची भीती आहे. काकडी, टोमॅटो व वांगी लागवडी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाच्या तडाख्यात विक्रीअभावी नुकसान झाले. तर, आता दरात सुधारणा झाली असताना शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल मातीमोल झाला आहे. यासह उभा असलेला उसाच्या पिकांचेही नुकसान झाले आहे.

चाऱ्याचा प्रश्न वाढणार पशुपालकांची चाऱ्याची मागणी असल्याने हे पीक लाभदायी ठरले आहे. मात्र मक्यासोबत चारा खराब झाल्याने चाऱ्याचा प्रश्न भेडसावणार आहे. प्रतिएकरी सरासरी ८ टन चारा निघतो. तुळसला प्रतिटन १५०० हजार रुपयांपर्यंत दर मिळतो. त्यामुळे एकरी चाऱ्याचे १२ हजार रुपयांपर्यंत नुकसान झाले आहे.  एकरी खर्च असा    

लागवड    २० ते २५ हजार
सर्वसाधारण एकरी उत्पादन   ३० ते ५० क्विंटल 
सध्याचा दर  ७ ते ८ रुपये किलो

प्रतिक्रिया गेल्या ८ वर्षांपासून मधूमका करतो. मागील वर्षी लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने २० टक्के उत्पादन घटले. या वर्षी प्रादुर्भाव व फवरण्याचा खर्च कमी झाला. मात्र वादळाच्या तडाख्यात मोठे नुकसान झाले.  - संजय सहाणे, शेतकरी, साकुर, ता. इगतपुरी

मधूमका काढायला आल्याने व्यवहार ८ रुपये प्रति किलोप्रमाणे ठरला होता. मात्र, वादळात मोठे नुकसान झाले. त्यामुळे अडचणी वाढतच आहेत. -मिलिंद कुकडे, शेतकरी, साकुर, ता. इगतपुरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT