‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाची १७ ला सुरुवात : राजू शेट्टी 
‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाची १७ ला सुरुवात : राजू शेट्टी  
मुख्य बातम्या

‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाची १७ ला सुरुवात : राजू शेट्टी 

टीम अॅग्रोवन

बुलडाणा : कापूस-सोयाबीन उत्पादकांचे प्रश्‍न, अतिवृष्टिग्रस्तांनी पीकविमा, नुकसानभरपाई आदी प्रश्‍नांबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. आंदोलन टप्प्याटप्प्याने तीव्र होणार असून, याची सुरुवात गुरुवारी (ता.१७) रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात नागपुरात धरणे आंदोलनाने होत आहे, अशी घोषणा संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. 

जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. या वेळी संघटनेचे नेते रविकांत तुपकर उपस्थित होते. श्री. शेट्टी म्हणाले, की सोयाबीन पेंडीची आयात थांबवा, पाम तेलावरचा आयात कर पूर्वीसारखा २० टक्के करा, किरकोळ व्यापाऱ्यांवर लादलेली स्टॉक लिमिट उठवा, विमा कंपन्यांनी कराराप्रमाणे सरासरीपेक्षा २५ टक्के पाऊस जास्त झालेल्या जिल्ह्यात सरसकट मदत द्यावी, कापणीपश्‍चात तारखेचा घोळ न घालता कृषी विभाग सांगते त्या पद्धतीने पीकविम्याचे क्लेम मंजूर करा, राज्याने जाहीर केलेली १० हजारांची नुकसान भरपाईची मदत एकरकमी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार आहे. 

याची सुरुवात बुधवारी (ता.१ ७) नागपुरात रविकांत तुपकर संविधान चौकात बेमुदत धरणे आंदोलनाने करतील. गुरुवारी (ता.१८) प्रत्येक गावात चावडीवर शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन होईल. शुक्रवारी (ता. १९) संघटनेने रास्ता रोको आंदोलन पुकारले असून, शनिवारी (ता. २०) गावबंद आंदोलन केले जाईल. अशा पद्धतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन टप्प्याटप्प्याने वाढत जाईल, असेही या वेळी राजू शेट्टी यांनी जाहीर केले. 

या वेळी श्री. शेट्टी यांनी कापूस, सोयाबीन उत्पादकांच्या समस्यांबाबत सविस्तर विवेचन केले. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून दिलासा मिळणे आवश्‍यक आहे. विदर्भ, मराठवाड्यातील सोयाबीन, कापूस पट्ट्यात शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

Food Grains : भरडधान्येच तारतील; आर्थिक आधार देतील

River Pollution : नदी प्रदूषणमुक्त करणारा ‘महाड पॅटर्न’

Agriculture Electricity : कृषी पंपाच्या वीजपुरवठा अनियमित पिकांना फटका; शेतकरी अडचणीत

SCROLL FOR NEXT